हैदराबाद : एचएमडीचा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉंच झाला आहे. HMD चा नवीन फोन 4G कनेक्टिव्हिटीसह बजेट किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन Unisoc 9832E चिपसेटसह येतो, जो Android 14 Go Edition वर चालतो. या HMD फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर आहे, जो ऑटोफोकस तसंच LED फ्लॅश युनिट आणि 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह लॉंच केला आहे. यासोबतच HMD Key ला IP52 रेटिंग देखील मिळाली आहे. कंपनीनं अद्याप भारतात लॉंचबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
HMD की किंमत : HMD Key स्मार्टफोन यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये GBP 59 (सुमारे 6,300 रुपये) मध्ये लॉंच करण्यात आला आहे. या फोनच्या सेल डिटेल्सबद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. हा एचएमडी फोन आइसी ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारात लॉंच करण्यात आला आहे.
HMD की तपशील : HMD की मध्ये 6.52-इंचाचा डिस्प्ले असून ज्याचा 60Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनचं रिझोल्यूशन 576 x 1,280 पिक्सेल आहे. या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 460 nits आहे आणि आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनमध्ये Unisoc 9832E चिपसेट आहे, जो 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतो. यासोबतच, हा HMD फोन 2GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे 128GB पर्यंत स्टोरेज विस्ताराला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 14 गो एडिशनवर चालेल, ज्याला कंपनी दोन वर्षांसाठी अपडेट देईल.
8-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेंसर : कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेंसर आहे, ज्यासोबत रात्रीच्या फोटोग्राफीसाठी LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाले तर, वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह 5-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्यात पोर्ट्रेट, नाईट, स्लो मोशन, टाइम-लॅप्स आणि पॅनोरमा सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. HMD Key मध्ये 4,000mAh बॅटरी आहे जी USB Type-C पोर्टद्वारे 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यात 4G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.4, FM, GPS आणि 3.5mm ऑडिओ जॅक देखील आहे.
हे वाचलंत का :