महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Skoda Elroq जागतिक स्तरावर लॉन्च, काय आहे खास? - Skoda Elroq EV SUV - SKODA ELROQ EV SUV

Skoda कंपनीनं आपली नवीन इलेक्ट्रिक Skoda Elroq SUV जागतिक स्तरावर सादर केली आहे. ही कार तीन बॅटरी पर्यायांमध्ये ऑफर केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 4, 2024, 3:32 PM IST

हैदराबाद : युरोपियन ऑटोमोबाईल निर्माता स्कोडानं पहिलं इलेक्ट्रिक वाहन सादर केलं आहे. Skoda Elroq नावाची ही EV कंपनी कोणत्या सेगमेंटमध्ये आणणार आहे? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जातील? एका चार्जमध्ये तुम्हाला किती किलोमीटरची रेंज मिळेल? ते कोणत्या किंमतीला लॉन्च केलं जाईल, चला जाणून घेऊया...

का आहे विशेष?: Skoda Elroq EV हे कंपनीचं पहिलं इलेक्ट्रिक वाहन आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्हीला कंपनीनं जागतिक स्तरावर सादर केली आहे. या SUV मध्ये अनेक उत्तम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये बॅटरी पॅकचे तीन पर्यायही देण्यात आले आहेत.कंपनीनं आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक फिचर दिले आहेत. यासोबतच स्कोडा बॅजिंग डार्क क्रोममध्ये देण्यात आली आहे. फ्रंट बंपरवर डार्क क्रोम इन्सर्ट देण्यात आलं आहेत.

स्कोडा Elroq (Skoda)

फोन चार्जिंगसाठी यात एलईडी मॅट्रिक्स हेडलाइट्स, डोअर मोल्डिंग्स, 21 इंच अलॉय व्हील, सी-आकाराचे मागील एलईडी लाईट, मागील स्पॉयलर, शार्क फिन अँटेना, 13 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटीरियर, (स्कोडा एलरोक इंटिरियर) मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. फोन बॉक्स, AI सपोर्टसह डिजिटल व्हॉईस असिस्टंट, इंटेलिजेंट पार्क असिस्ट, नऊ एअरबॅग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ट्रॅफिक जॅम असिस्ट, pACC, ABS, EBD सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

स्कोडा Elroq (Skoda)

बॅटरी :यामध्ये कंपनीने बॅटरी पॅकचे तीन पर्याय दिले आहेत. ज्यामध्ये एकूण बॅटरी क्षमता 50, 60 आणि 85 kWh दिली आहे. वेगवान चार्जर वापरून 52kWh क्षमतेची बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 25 मिनिटे लागतात. 59kWh बॅटरी चार्ज करण्यासाठी 24 मिनिटे आणि 77kWh बॅटरी चार्ज करण्यासाठी 28 मिनिटे लागतात. हे 125 kWh, 150 kWh आणि 210 kWh चे पॉवर आउटपुट प्रदान करतात. 50 आणि 60 KWh प्रकारांचा टॉप स्पीड 160 kmph पर्यंत आहे.

स्कोडा Elroq (Skoda)

85 kWh बॅटरी व्हेरियंटचा टॉप स्पीड 180 kmph पर्यंत आहे. 0-100 किमी/ताशी वेग येण्यासाठी नऊ सेकंद, 8.5 सेकंद आणि 6.6 सेकंद लागतात. SUV ला एका चार्जवर 375 ते 581 किलोमीटरची WLTP रेंज मिळते.

स्कोडा Elroq (Skoda)

किंमत : कंपनीनं युरोपियन बाजारासाठी 33 हजार युरोच्या किमतीत आणली आहे. या कारची किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 30.69 लाख रुपये आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत कार युरोपियन बाजारपेठेत उपलब्ध होईल. यानंतरही ती इतर देशांमध्येही लॉंच केली जाईल. ही SUV पुढील वर्षाच्या अखेरीस भारतातही लॉंच होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details