हैदराबाद :आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पोस्ट ऑफिस, डीड नोंदणी, बँक, हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. तसंच, केवायसी पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक कागदपत्रांपैकी आधार कार्ड आहे. त्यामुळं तुमचं आधार मधील नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी तपशील बरोबर असले पाहिजेत. तसंच, आधार नोंदणी आणि नूतनीकरण विनियम 2016 नुसार, आधार कार्ड धारकांनी आधार नोंदणीच्या तारखेपासून दर दहा वर्षांनी एकदा त्यांचं आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. त्यामुळं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) नागरिकांना त्यांचं आधार कार्ड अपडेट करण्याचं आवाहन केलंय.
आधार अपडेटची शेवटची तारीख :MY Aadhaar पोर्टलवर मोफत आधार अपडेट करण्याची 14 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. 14 सप्टेंबरनंतर, तुम्हाला फी भरून आधार कार्ड अपडेट करावं लागेल.
14 सप्टेंबर नंतरची प्रक्रिया : UIDAI नं आधार कार्डधारकांना आधार कार्डसाठी सबमिट केलेली ओळख आणि पत्ता पुरावा कागदपत्रं अपलोड किंवा अपडेट करण्यास सांगितलं आहे. जर एखाद्या व्यक्तीनं 14 सप्टेंबर 2024 पूर्वी त्यांचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर अशा नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टलवर रुपये 25 किंवा आधार केंद्रांवर 50 रुपये भरावे लागतील.
आधार कार्डच्या नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे : तुमच्या आधार कार्ड नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला my Aadhaar पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रे लागणार आहेत.
खालीलपैकी कोणताही आयडी पुरावा :
- पासपोर्ट
- वाहन चालविण्याचा परवाना
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- लेबर कार्ड
- गुणपत्रिका
- विवाह प्रमाणपत्र
- शिधापत्रिका