महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

ETV Bharat / technology

सेकंड हँड कार खरेदी 'ही' काळजी घ्या, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई - Second hand car buying tips

Second hand car buying tips : सणासुदीच्या काळात अनेक लोक कार खरेदी करण्याचा विचार करतात. त्यापैकी बरेच लोक सेकंड हँड कार खरेदी करतात. सेकंड हँड कार खरेदी करताना अनेक जण फसवणुकीचे बळी ठरतात. हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल माहिती देणार आहोत, तर चला जाणून घेऊया...

Second hand car buying tips
प्रातिनिधिक छायाचित्र (AI)

हैदराबाद Second hand car buying tips :आर्थिक कारणामुळं बरेच लोक सेकंड हँड कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात. मात्र, अशा गाड्या खरेदी केल्यानं तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळं पहिल्यांदा वापरलेली कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी?, कोणती कागदपत्र तपासावी चला जाणून घेऊया...

कारची तपासणी करा :जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करणार असाल, तेव्हा कार खरेदी0 करण्यापूर्वी तिची स्थिती नीट तपासून घ्यावी. जर तुम्हाला तांत्रिक बाबींचं योग्य ज्ञान नसे,ल तर तुम्ही मेकॅनिकचीही मदत घेऊ शकता.

टायरची पडताळी करा : जुनी कार खरेदी करताना, त्याच्या टायरची स्थिती निश्चितपणे तपासा. जर टायर खूप खराब असतील तर ते त्वरित बदलावे लागतील. अनेक लोक जुनी कार खरेदी केल्यानंतर लगेच टायर बदलतात.

देखभाल नोंदी तपासा : सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी तिची मेंटेनन्स हिस्ट्री नक्कीच तपासा. यामुळं तुम्हाला कळेल की कारची सर्व्हिस योग्य प्रकारे केली जात आहे की नाही. यामुळं कारची देखभाल किती चांगली आहे, हे देखील कळेल.

नोंदणी तपासा :सेकंड हँड कार घेण्यापूर्वी तिची नोंदणी झाल्यीच खात्री करून घ्यावी. कारच्या उत्पादनाची तारीख काय आहे? ती कधी खरेदी केली? याची माहिती घ्यावी. यामुळं कार किती जुनी आहे, हे देखील कळेल.

विमा :जुनी कार खरेदी केल्यानंतर लगेचच तिचा विमा तुमच्या नावावर हस्तांतरित करावा. हे काम वेळेवर न केल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

टेस्ट ड्राइव्ह घ्या : वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कार चालून पाहणे आवश्यक आहे. या वेळी, तुम्ही हायवे, अरुंद रस्त्यावर किंवा रहदारी असलेल्या रस्त्यावर गाडी चालवून त्याची चाचणी घेऊ शकता. चाचणीच्या वेळी कारचे ब्रेक, क्लच, एक्सीलरेटर योग्यरित्या काम करत असल्याची खात्री करा. त्यानंतरच कार खरेदी करण्याचा निर्णय घ्या. तुम्ही वरील दिलेल्या टिप्स फॉलो न केल्यास तुम्हाच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळं कार खरेदी करताना कारची कागदपत्रे नक्की तपासावी.

हे वाचलंत का :

  1. महिंद्रा थार रॉक्सचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू, दसऱ्याला मिळणार डिलिव्हरी - Mahindra Thar Roxx booking
  2. Tata Nexon CNG फक्त 8.99 लाख रुपयांना, Nexon मिळतोय बंपर डिस्काउंट - Tata Nexon CNG launched
  3. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी, कार विक्रीत 2.27 टक्के वाढ - Electric vehicle sales

ABOUT THE AUTHOR

...view details