हैदराबाद : itel नं आपला वर्षातील पहिला स्मार्टफोन itel A80 भारतात लॉंच केला आहे. हा फोन बजेट प्राइस पॉईंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. खरं तर तुम्हाला माहित असेल की itel ब्रँड 7 ते 10 हजार रुपयांच्या किंमतीत स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी ओळखला जातो.
itel a80 किंमत : फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच फोनमध्ये IP54 वॉटर रेसिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर हा फोन 6,999 रुपये किंमतीत लॉंच करण्यात आला आहे. itel A80 स्मार्टफोन सँडस्टोन ब्लॅक, ग्लेशियर व्हाइट आणि वेव्ह ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो.
itel A80 चे वैशिष्ट्य : Itel A80 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा पंच होल डिस्प्ले आहे, ज्यामध्ये डायनॅमिक बार वैशिष्ट्य आहे. फोनमध्ये स्मूथ इंटरफेसचा अनुभव उपलब्ध आहे. प्रगत प्रक्रियेसाठी फोनमध्ये 8GB रॅमचा सपोर्ट आहे. यात 4GB GB RAM सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे.
itel A80 चे कॅमेरा वैशिष्ट्य : कंपनीचा दावा आहे की, हा फोन तीन वर्षांसाठी लॅग-फ्री अनुभव देईल. या फोनमध्ये 50 MP सुपर HDR कॅमेरा आहे. फोन रिंग लाईट नोटिफिकेशन फीचर सह येतो. फोनच्या समोर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा पंच-होल डिस्प्ले आहे. फोन IP54 रेटिंगसह येतो. फोन Android 14 Go OS आणि Unisoc T603 Octa-core प्रोसेसरनं सुसज्ज आहे.
itel A80 बॅटरी : फोनमध्ये 5000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाईल. तुम्ही 10W चार्जरच्या मदतीनं फोन चार्ज करू शकाल. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे.
हे वाचलंत का :