हैदराबाद : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ISRO नं अंतराळात बियाण उगवण्याचा चमत्कार केलाय. प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजून घेणं, हा या प्रयोगाचा उद्देश आहे. यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यातील रणनीती आखली जाईल, असं इस्त्रोनं म्हटलं आहे.
Leaves have emerged! 🌱 VSSC's CROPS (Compact Research Module for Orbital Plant Studies) aboard PSLV-C60 POEM-4 achieves a milestone as cowpea sprouts unveil their first leaves in space. 🚀 #ISRO #BiologyInSpace #POEM4 pic.twitter.com/xKWmGHoPfl
— ISRO (@isro) January 6, 2025
इस्रोनं अंतराळात उगवलं बियाणं : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) अंतराळात आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत चार दिवसांत अंतराळयान PSLV-C60 च्या POEM-4 प्लॅटफॉर्मवर बिया उगवण्यात इस्रोला यश आलं आहे. इस्रोनं सोमवारी X वर पोस्ट करत बियांमधून पानं बाहेर येत असल्याचं सांगितलंय. काऊसीडचं बीज (चवळीचं बीयानं) हे लेबियांच्या बियासारखं दिसतंय. या बीजात भरपूर पोषक तत्व असतात.
24 विविध प्रकारचे प्रयोग : या प्रयोगासाठी कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज (CROPS) अंतर्गत एकूण आठ बिया अवकाशात पाठवण्यात आल्या होत्या. विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं ही चाचणी केलीय. PSLV-C60 मोहिमेनं 30 डिसेंबर रोजी दोन SpaceX उपग्रह अवकाशात सोडले होते. या दरम्यान रॉकेटच्या चौथ्या टप्प्यातील POEM-4 प्लॅटफॉर्म 350 किमी उंचीवर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे, जिथं 24 विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत.
वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजणार : प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजून घेणं हा या प्रयोगाचा उद्देश असल्याचं इस्रोनं सांगितलं. यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यातील रणनीती आखली जाणार आहे. इस्रोनं स्पेस डॉकिंग प्रयोगाअंतर्गत चेझर उपग्रहाचा सेल्फी व्हिडिओ देखील शेअर केला आहे, जो 470 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर असं करणारा भारत हा चौथा देश ठरेल. शास्त्रज्ञांनी अंतराळात बीजांची उगवण करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली होती. कॅमेरा इमेजिंग, ऑक्सिजन, एन आणि कार्बन डाय ऑक्साईड पातळी, तापमान आणि मातीतील आर्द्रता यांचं परीक्षण केलं गेलं.
हे वाचलंत का :
इस्रोनं स्पॅडेक्स मिशनचं डॉकिंग शेड्यूल 9 तारखेपर्यंत पुढं ढकललं