हैदराबादSave money save electricity : देशात विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळं वीज बचत करणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीय. कारण तुम्हालही अनेक वेळा वीज बिल जास्त आलंच असेल. त्यामुळं तुम्हा यापासून सुटका हवी असले तर, तुम्ही वीज बजत करून तुमचे पैसे देखील सेव करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
एलईडी लाईटचा वापर करावा :पारंपारिक इनॅन्डेन्सेंट बल्बमुळं वीज जास्त लागते. त्यामुळं तुम्हाला विजेचं बील देखील जास्त येत. त्यासाठी तुम्ही तुमच्या घरात LED लाइट वापरावा. यातून तुमचे बरेच पैसे सेव होतील. तसंच तुम्ही विजेच्या बचतीत देखील योगदान देऊ शकता. LED लाइट 90% पर्यंत कमी ऊर्जा वापरतात तसंच ते लाईट जास्त काळ टिकतात. त्यामुळं तुमचा फायदा होतो. यातून विजेचा बल्ब वारंवार बदलण्याची गरज पडत नाही.
उपकरणे अनप्लग करा : वीज वापर कमी करण्यासाठी चार्जर, टीव्ही, संगणकासह इतर गॅझेट वापरात नसताना अनप्लग करा. जनेकरून विजेची बचत होईल. तसंच तुमचे उपकरणं देखील खराब होणार नाही. आपण गरज नसताना कधी कधी चार्जर प्लगलाच लावून ठेवतो. त्यातून विजेची खपत होते. अशा वेळी तुम्ही असे गॅझेट अनप्लग करणं गरजेचं आहे.
एसीचा वापर कमी करावा : तुमच्या घरात एसी (Thermostat Ac Suspension) असेल तर हिवाळ्यात त्याचा वापर करू नये. त्यामुळं तुम्हाला उन्हाळ्यात लागणाऱ्या विजेची बचत करता येईल.
पॉवर स्ट्रिप्स वापरा : टीव्ही आणि संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्सला पॉवर स्ट्रिपमध्ये प्लग करावं. तसंच अशा वस्तू स्टँडबाय ठेऊ नयेत. संगणकाची गरज नसेल तर, ते बंद करावं. स्टँडबाय मोडमुळं तुमच्या विजेची खपत होते. त्यामुळं लाईट बील जास्त येऊ शकतं.