हैदराबाद Rolls Royce Cullinan facelift :Rolls Royce कंपनीनं Cullinan फेसलिफ्ट भारतात लॉन्च केलीय. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.50 कोटी रुपये आहे. तसंच ब्लॅक बॅज आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत 12.25 कोटी रुपये आहे. ही एक अद्ययावत SUV आहे, जी Cullinan Series II म्हणून ओळखली जाते. या कारला 2024 मध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आलं होतं. नुकताचं या कारची भारतात एन्ट्री झालीय. यात नवीन इंटीरियर आणि तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. ही कार कोणत्या फीचर्ससह लॉन्च झाली? चाल जाणून घेऊया...
रोल्स रॉयस कुलीनन फेसलिफ्ट : Cullinan Series II च्या बाहेरील भागात L-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स असलेले स्लिम हेडलॅम्प दिलेले आहेत, जे बंपरपर्यंत वाढता येतात. याच्या ग्रिलला नवीन डिझाइन देण्यात आलं आहे. त्याच्या मागील बंपरला स्टेनलेस-स्टील स्किड प्लेटसह नवीन रूप देण्यात आलें आहे. त्याची अलॉय व्हील्सही नवीन देण्यात आली आहेत.
इंटीरियर : कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं, तर डॅशबोर्डवर काचेचं पॅनेल देण्यात आलं आहे. डॅशमध्ये एक नवीन डिस्प्ले कॅबिनेट देखील आहे, ज्यामध्ये ॲनालॉग घड्याळ आणि त्याच्या खाली एक लहान स्पिरिट ऑफ एक्स्टसी आहे. हा स्पिरिट इन्फोटेनमेंट सिस्टमच्या नवीनतम प्रकारासह येतो, ज्यामध्ये नवीन ग्राफिक्स आणि डिस्प्ले पाहायला मिळतो.