हैदराबाद : व्हॉट्सॲप नेहमी नवनवीन अपडेट आणत असतं. लोकांचा अनुभव सुधारण्यासाठी व्हॉट्सॲप दररोज प्लॅटफॉर्मवर नवीन उपयुक्त फीचर्स जोडत आहे. एका अहवालानुसार, व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी रिव्हर्स इमेज सर्च फीचर आणत आहे. या फीचरद्वारे, प्लॅटफॉर्म ऑनलाइन वेगाने वाढत असलेल्या फेक माहितीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे नवीन फीचर प्रथम व्हॉट्सॲप अँड्रॉइड बीटा ॲपमध्ये दिसलं होतं. आता ते WABetainfo द्वारे व्हॉट्सॲप वेब बीटावर दिसत आहे. हे नवीन फीचर कसं काम करतं चला जाणून घेऊया...
एका अहवालानुसार, नवीन व्हॉट्सॲप फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetainfo नं म्हटलं आहे की हे फीचर व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना गुगलच्या मदतीनं त्यांच्यासोबत शेअर केलेले फोटो ऑथेंटिकेट करण्याची परवानगी देईल. नवीन फीचरमुळं वापरकर्त्यांना त्यांच्यासोबत शेअर केलेल्या फोटोशी छेडछाड केल्यास ओळखण्यास मदत होईल.
फीचर कसं करणार काम :व्हॉट्सॲप वेब ॲप्लिकेशनवरूनच रिव्हर्स इमेज सर्च प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक शॉर्टकट देण्यात येणार आहे. जेव्हा वापरकर्ते वेबवर इमेज सर्च करण्याचा निर्णय घेईल, तेव्हा व्हॉट्सॲप वापरकर्त्याच्या मान्यतेनं ती इमेज गुगलवर अपलोड करेल आणि रिव्हर्स इमेज सर्च प्रक्रिया सुरू करण्यासाठी डीफॉल्ट ब्राउझर लाँच करेल. तथापि, संपूर्ण रिव्हर्स इमेज सर्च प्रक्रिया गुगलद्वारे नियंत्रित केली जाईल.