महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Jio च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त बंपर ऑफर, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Jio Anniversary Offers 2024 - JIO ANNIVERSARY OFFERS 2024

Jio Anniversary Offers 2024: Jio नं आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. काही रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. Zomato चं गोल्ड सबस्क्रिप्शन देखील ऑफरमध्ये उपलब्ध असेल.

Jio Anniversary Offers 2024
Jio वर्धापनदिन ऑफर (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 5, 2024, 5:01 PM IST

हैदराबाद Jio Anniversary Offers 2024 :Reliance Jio नं आपल्या ग्राहकांसाठी निवडक रिचार्ज प्लॅनवर विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीनं आपल्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त ही ऑफर जाहीर केलीय. ही ऑफर निवडक रिचार्जसाठी वैध आहे. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान रिचार्ज करणाऱ्या Jio ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतचा यात फायदा मिळेल. ही ऑफर 899 रुपये, 999 रुपये तसंच 3599 रुपयांच्या वार्षिक प्लॅनसह उपलब्ध असेल. 490 दशलक्षाहून अधिक ग्राहकांसह Jio सर्वात मोठी कंपनी आहे. आता Jio नं आपल्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट आणली आहे.

जिओ वर्धापन दिन ऑफर :निवडक प्लॅनसह रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील, ज्यामध्ये 10 OTT चे सदस्यत्व आणि 175 रुपयांच्या 28 दिवसांच्या वैधतेसह 10GB डेटा पॅकचा समावेश आहे. याशिवाय, Jio वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तीन महिन्यांसाठी Zomato गोल्ड मेंबरशिप मिळेल. 2999 रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर 500 रुपयांचं AJIO व्हाउचर मिळेल.

जिओचा 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल.

जिओचा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : या प्लॅनची ​​वैधता 98 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.

जिओचा 3599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :या प्लॅनची ​​वैधता 356 दिवसांची आहे. यामध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. डेटाबद्दल बोलायचं झालं, तर दररोज 2.5GB डेटा मिळतो. तसंच, अमर्यादित 5G डेटा उपलब्ध असेल.

हे वाचंलत का :

  1. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 'या' तारखेपासून सुरू, 80% पर्यंत मिळणार सूट - Flipkart Big Billion Days 2024
  2. Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लॉन्च, HD+ स्क्रीन आणि 50MP ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप - Samsung Galaxy A06 Launched
  3. मोबाईलच्या अतिवापरामुळं होतोय कर्करोग? फोनचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम - Does mobile phones cause cancer

ABOUT THE AUTHOR

...view details