हैदराबाद : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षात अनेक फोन लॉंच होण्यासाठी सज्ज आहेत. येथे आम्ही जानेवारीमध्ये लॉंच होणाऱ्या स्मार्टफोनची यादी तयार केली आहे. या यादीत Redmi, Intel आणि OnePlus सारख्या ब्रँडचा समावेश आहे.
Redmi 14C 5G : Redmi 14C 5G स्मार्टफोन भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये 6 जानेवारी रोजी लॉंच केला जाईल. त्याची मायक्रोसाइट Amazon आणि Flipkart या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर थेट झाली आहे, म्हणजेच लॉंच झाल्यानंतर तो दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या मागील पॅनलच्या मध्यभागी एक मोठा गोलाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. फोनला 50-मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळेल.
Introducing the all-new #Redmi14C 5G – the #2025G smartphone everyone has been waiting for!
— Redmi India (@RedmiIndia) December 27, 2024
It’s time to make a style resolution and elevate your connectivity with the power of #5G.
Launching on 6th January 2025.
Get notified: https://t.co/kUp6U9oLHq
Redmi 14R 5G ची रीबॅज केलेली आवृत्ती असू शकते, अशी चर्चा आहे. जर ही 14R ची रिबॅज केलेली आवृत्ती असेल, तर Redmi 14C 5G स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिपसेट आणि 18W चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरीसह लॉंच केला जाऊ शकतो. यात 6.68-इंच 120Hz HD Plus LCD स्क्रीन आणि Android 14 वर आधारित HyperOS मिळण्याची अपेक्षा आहे. फोन काळ्या, निळ्या आणि जांभळ्या शेडमध्ये लॉंच होऊ शकतो.
OnePlus 13R मालिका : OnePlus 7 जानेवारी रोजी OnePlus 13 मालिका भारतासह जागतिक बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या मालिकेत OnePlus 13 आणि OnePlus 13R या दोन स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश असेल. दोन्ही फोनची मायक्रोसाइट ॲमेझॉनवर लाइव्ह झाली आहे. फोनचे रंग पर्याय आणि विशेष वैशिष्ट्ये देखील समोर आली आहेत. OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असेल, तर 13R ला Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळेल. दोन्ही फोन OnePlus AI सपोर्टसह AI वैशिष्ट्यांची ऑफर करतील.
It's time to experience unmatched speed, refined craftsmanship, and effortless innovation. Inspired by the Never Settle spirit, get ready to meet the all-new #OnePlus13 Series on January 7, 2025
— OnePlus India (@OnePlus_IN) December 17, 2024
OnePlus 13 भारतात आर्क्टिक डॉन, ब्लॅक एक्लिप्स आणि मिडनाईट ओशन कलर पर्यायांमध्ये लॉंच केला जाईल, तर OnePlus 13R एस्ट्रल ट्रेल आणि नेब्युला नॉयर शेडमध्ये येईल. दोन्हीमध्ये 6000mAh बॅटरी असेल. OnePlus 13 मध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देखील असेल. OnePlus 13 ची भारतात किंमत 67,000 ते 70,000 रुपये असण्याची शक्यता आहे. OnePlus 13R एकाच रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये (12GB+256GB) येण्याची अपेक्षा आहे. OnePlus 13R च्या किंमत श्रेणीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
Itel Geno 10 : Itel भारतात Geno 10 स्मार्टफोन लॉंच करणार आहे. फोनची मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह झाली आहे. फोन जानेवारी 2025 मध्ये लॉंच केला जाईल. कंपनीनं फोनची सुरुवातीची किंमत तसंच लॉंच तारीख समोर आलेली नाहीय. मात्र, फोनची सुरुवातीची किंमत किती असेल. 6,000 पेक्षा कमी अशू शकते. हा फोन जेनिथल डिझाइनसह येईल. या फोनला चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल मिळेल. फोनला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये दोन कॅमेऱ्यांसोबत LED सेटअप स्थापित केला जाईल. फोनला वॉटरड्रॉप नॉचसह आयफोनच्या डायनॅमिक आयलँड सारखा नॉच मिळेल. Gen Z-फोकस फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी असेल.
काय असेल किंमत : Itel आपला A80 स्मार्टफोन जानेवारीमध्ये लॉंच करेल. कंपनीनं आपल्या अधिकृत साइटवर याची माहिती दिली आहे. MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, हा फोन 8,000 रुपयांच्या किंमत रेंजमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा असेल. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फोन IP54 रेटिंगसह येईल. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येईल आणि 4GB व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करेल.
Poco X7 मालिका : Poco X7 मालिका 9 जानेवारी, 2025 रोजी लाँच केली जाईल. Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G सह लाइनअप, व्हेगन लेदर फिनिशसह ड्युअल-टोन पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या प्रकारात येईल.
Don't just meet expectations; Smash them 😈#POCOX7 Series launching on 9th Jan | 5:30 PM IST on #Flipkart pic.twitter.com/aHCFNVDQaV
— POCO India (@IndiaPOCO) December 30, 2024
Oppo Reno 13 5G मालिका : Oppo Reno 13 5G मालिका Oppo Reno 13 5G आणि Oppo Reno 13 Pro 5G दोन मॉडेल्समध्ये येईल. हे दोन्ही मॉडेल मिड-रेंज सेगमेंटमध्ये लॉंच केले जातील. हे स्मार्टफोन 5,640mAh बॅटरीसह MediaTek Dimensity 8350 चिपसेटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. Oppo Reno 13 5G मालिकेची अधिकृत लॉंच तारीख अद्याप जारी केलेली नाही.
Every moment has a story. Live in the moment as we unveil the launch of #OPPOReno13Series on 9th January 2025.#OPPOAIPhone #LiveInTheMoment
— OPPO India (@OPPOIndia) January 3, 2025
Know more: https://t.co/CQ6etIk4u5 pic.twitter.com/jfceSpDpky
Samsung Galaxy S25 मालिका : Samsung Galaxy S25 मालिकेची अधिकृत लॉंच तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीय. परंतु आगामी 'Galaxy Unpacked Event' 22 जानेवारी 2025 रोजी होण्याची अपेक्षा आहे. Galaxy S25 मालिका तीन मॉडेल्समध्ये येईल-- Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra. या अपडेटेड मॉडेल्सना वर्धित कॅमेरा आणि परफॉर्मन्स मिळेल. टॉप-स्पेक, Galaxy S25 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असेल जो फ्लॅगशिप परफॉर्मन्स ऑफर करतो.
Realme 14 Pro मालिका : हा कॅमेरा-केंद्रित स्मार्टफोन असेल, जो येत्या काही दिवसांत लॉंच होण्याची अपेक्षा आहे. डिव्हाइसचे डिझाइन, वैशिष्ट्ये आणि रंग पर्याय कंपनीनं प्रदर्शित केले आहेत. Realme 14 Pro मालिका IP69 रेटिंगसह येईल.
Meet the phone that’s rewriting the rules.
— realme (@realmeIndia) December 23, 2024
With a design so unique and bold, it’s not just a device; it’s a masterpiece. This is what one of a kind truly looks like. #realme14ProSeries5G
Know more:https://t.co/ILXGh5heM3 pic.twitter.com/0DneOPHLD2
हे वाचलंत का :