हैदराबाद : POCO X7 मालिका 9 जानेवारी 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे. या मालिकेत POCO X7 आणि POCO X7 Pro मॉडेल असतील. दोन्ही डिव्हाइसेस मीडियाटेक चिपसेटनं सुसज्ज असेल. POCO X7 मध्ये डायमेन्सिटी 7300 -अल्ट्रा आणि X7 प्रो मध्ये डायमेन्सिटी 8400 -अल्ट्रा SoC चिपसेट असेल. हे डिव्हाइसेस फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.
शाओमीचा सब-ब्रँड POCO भारतात त्यांची बहुप्रतिक्षित POCO X7 मालिका लाँच करण्यास सज्ज आहे. तंत्रज्ञान प्रेमींमध्ये ही मालिका खूप चर्चेत आहे. या मालिकेत POCO X7 आणि POCO X7 Pro मॉडेल्स लाँच होण्याची अपेक्षा आहे. या डिव्हाइसेसचे अनेक स्पेसिफिकेशन आधीच ऑनलाइन लीक झाले आहेत. POCO त्यांच्या X7 मालिकेसाठी मीडियाटेक चिपसेट वापरेल, ज्यामुळं Xiaomi आणि POCO मधील भागीदारी अधिक मजबूत होईल.
लाँचिंग तारीख आणि वेळ : POCO X7 मालिका 9 जानेवारी 2025 रोजी भारतात लॉंच होईल .लाँचिंग कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता होईल. कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही बातमी शेअर केली. हे डिव्हाइसेस फ्लिपकार्टद्वारे विकले जातील. POCO इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी देखील पुष्टी केली आहे की मालिकेत कोणताही "निओ" प्रकार नसेल.
स्पेसिफिकेशन :
POCO X7 :
- चिपसेट : मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 -अल्ट्रा SoC.
- रॅम आणि स्टोरेज : 12 GB पर्यंत रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज.
- POCO X7 प्रो :
- चिपसेट : मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 -अल्ट्रा SoC.
- सॉफ्टवेअर: दोन्ही डिव्हाइसेस अँड्रॉइड 2.0 वर आधारित हायपरओएस 15 सह येतील.
- डिस्प्ले : 6.67 -इंच स्क्रीन. 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5 K रिझोल्यूशन सपोर्ट.
2024 मध्ये भारतात मध्यम श्रेणीतील उपकरण म्हणून POCO ची X6 मालिका सर्वोत्तम मानली जात होती. आता ग्राहकांना चांगला अनुभव देताना POCO X7 मालिका कमी किमतीत चांगली कामगिरी करू शकते का? हे पाहणे मनोरंजक असेल. POCO X7 मालिकेबद्दल अधिक माहिती लाँचवेळी कळेल. POCO X7 मालिका तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक मोठं आकर्षण असेल.
हे वाचंलत का :