हैदराबाद : शाओमी रेडमी टर्बो 4 स्मार्टफोन 2 जानेवारी रोजी लाँच करणार आहे. हा फोन डायमेन्सिटी 8400-अल्ट्रा चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला फोन आहे. लाँच होण्यापूर्वी, कंपनीनं स्मार्टफोनचं डिझाइन आणि रंग प्रकार उघड केले आहेत. टर्बो 4 चा एकूण लूक आयफोन 16 सारखाच असणार आहे. हा फोन चीनमध्ये लाँच होणार आहे. त्यानंतर तो जागतिक बाजारपेठे लॉंच होण्याची शक्यता आहे.
टिपस्टरनं शेअर फोटोवरून रेडमी टर्बो 4 तीन रंगांच्या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन काळ्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगात येणार आहे. असा अंदाज आहे की हा फोन जागतिक स्तरावर पोको एक्स7 प्रो म्हणून लाँच केला जाऊ शकतो.
रेडमी टर्बो 4 डिझाइन : रेडमी टर्बो 4 च्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये लाल रंगाच्या रंगांसह 50-मेगापिक्सेलचा ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. मागील कव्हरमध्ये फ्रोस्टेड मॅट ग्लाससह वरपासून खालपर्यंत जाणारी एक रेषा आहे, ज्यामुळं तो ड्युअल-टोन फिनिश देतो. टर्बो 4 चा एकूण लूक आयफोन 16 ची आठवण करून देणारा आहे.
ब्रँडनं फोनच्या फ्रंट डिझाइनचा खुलासा केलेला नसला तरी, त्यात फ्लॅट डिस्प्ले असेल. स्पीकर, मायक्रोफोन आणि आयआर ब्लास्टरसाठी पोर्ट डिव्हाइसच्या वरच्या काठावर दिले आहेत. डिव्हाइसच्या उजव्या काठावर व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर की आहे. फोनमध्ये सिम स्लॉट, मायक्रोफोन, यूएसबी-सी पोर्ट आणि खालच्या काठावर स्पीकर आहे.
रेडमी टर्बो ४ फीचर्स लीक : रेडमी टर्बो 4 मध्ये 6.67-इंचाची एमोलेड स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे जी 1.5K रिझोल्यूशन आणि 1a 20Hz रिफ्रेश रेट देतो. यात 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा युनिट असेल. टर्बो 4 मध्ये डायमेन्सिटी 8400-अल्ट्रा, 16 जीबी पर्यंत रॅम, 512 जीबी पर्यंत स्टोरेज आणि 90 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,550 एमएएच बॅटरी असेल.
हे वाचलंत का :