हैदराबाद Redmi K80 Pro :Redmi K80 Pro स्मार्टफोन लवकरच 27 नोव्हेंबरला चीनमध्ये लॉंच होऊ शकतो. या फोनमध्ये 2K M9 OLED फ्लॅट स्क्रीन, 6000mAh बॅटरी आणि Snapdragon 8 Elite SoC आहे. Redmi K80 Pro स्मार्टफोनचे लॉंच होण्यापूर्वीचं स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. कॅमेरापासून बॅटरीपर्यंत सर्वकाही जाणू घ्या, या बातमीतून....
Redmi K80 Pro :Xiaomi नं त्याच्या आगामी स्मार्टफोन Redmi K80 Pro च्या बॅटरी आणि कॅमेरा वैशिष्ट्यांची पुष्टी केली आहे. हा फोन आपल्या दमदार फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञानासह बाजारात येण्यासाठी सज्ज आहे. या फोनच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.
Redmi K80 Pro : फीचर Redmi K80 Pro मध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी त्याच्या आधीच्या मॉडेल K70 Pro च्या 5000mAh बॅटरीपेक्षा जास्त क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन 120W सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि 50W वायरलेस चार्जिंग सुविधा देखील देतो. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो लाइट फ्यूजन 800 सेन्सर वापरतो. याशिवाय, यात 32MP 120° अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे, ज्यामध्ये 10cm मॅक्रो पर्याय देखील आहे.