महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

20 नोव्हेंबरला Xiaomi करणार धमका, 10 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉंच होणार Redmi A4 5G स्मार्टफोन - REDMI A4 5G LAUNCH ON NOVEMBER 20

Redmi A4 5G स्मार्टफोन भारतात 20 नोव्हेंबर रोजी लॉंच होणार आहे. यात स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये असतील.

Redmi A4 5G
Redmi A4 5G स्मार्टफोन (Xiaomi)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 16, 2024, 11:14 AM IST

हैदराबाद Redmi A4 5G launch on November 20 : Xiaomi आपला नवीन 5G स्मार्टफोन Redmi A4 5G भारतात 20 नोव्हेंबर रोजी लॉंच करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन भारतातील लेटेस्ट Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरनं सुसज्ज असलेला पहिला डिव्हाइस असेल. तसंच, त्याची किंमतही कमी असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आतापर्यंत समोर आलेल्या तपशीलांवर एक नजर टाकूया या बातमीतून...

Redmi A4 5G मध्ये काय असतील फीचर :Redmi A4 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.88-इंचाचा डिस्प्ले असेल. या फोनमध्ये नवीनतम Snapdragon 4s Gen 2 SoC प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंग दरम्यान जलद आणि सहज काम करेल.

5160mAh बॅटरी :कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, Redmi A4 5G मध्ये 50MP मेन रियर कॅमेरा असेल, जो उत्तम फोटो काढण्यास सक्षम आहे. यासोबत दुय्यम कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्यामुळं फोटोग्राफीचा अनुभव आणखी चांगला होईल. फोनचं डिझाईन "हॅलो ग्लास सँडविच" शैलीत असून याला प्रीमियम लुक फील देतो. हा स्मार्टफोन मोठ्या 5160mAh बॅटरीनं सुसज्ज असेल. यासोबतच Xiaomi नं यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे, जो 18W पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्याची शक्यता आहे.

Redmi A4 5G किंमत : Xiaomi नं इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 दरम्यान या फोनची किंमत ₹ 10 हजारांपेक्षा कमी असणार असल्याचं म्हटलं होतं. ज्यामुळं हा 5G सेगमेंटमध्ये परवडणारा फोन बनेल. ग्राहक Redmi A4 5G Amazon.in, Xiaomi इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरवर खरेदी करू शकतात.

स्वस्त किमतीत लाँच होणार :Redmi A4 5G स्मार्टफोन भारतात 20 नोव्हेंबर रोजी लॉंच होईल. हा फोन तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकता. यात स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर, 6.88-इंचाचा 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये असतील.

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग Galaxy M05 भारतात 50MP ड्युअल कॅमेरा आणि जबरदस्त डिस्प्लेसह लॉंच
  2. व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
  3. YouTube Shorts निर्मात्यांसाठी AI फीचर, AI च्या माध्यमातून गाणी करता येणार रीमिक्स

ABOUT THE AUTHOR

...view details