हैदराबादPrime Minister Internship Scheme : भारताच्या अर्थमंत्री निर्माला सितारमन यांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजना 1 कोटी युवा 2024 ची घोषणा केलीय. शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन त्यांनी ही घोषणा केली. या योजनेअंतर्गत , भारत सरकार शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करणार आहे. भारत सरकार योजनेअंतर्गत निवडेलल्या सर्व अर्जदारांना आर्थिक सहाय्य आणि मासिक स्टायपेंड देणार आहे. योजनेतील आर्थिक सहाय्य थेट निवडलेल्या अर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केलं जाणार आहे.
1 कोटी युवकांसाठी इंटर्नशिप योजना :भारतातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केलीय. भारताच्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार एकूण 1 कोटी तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. इंटर्नशिपचं आयोजन करून भारत सरकार देशातील तरुणांना पाठबळ देणार आहे. या इंटर्नशिपमुळं तरुणांना सहज नोकरी मिळण्यास मदत होईल. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सर्व अर्जदारांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजना 1 कोटी युवा 2024 लाभांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणं तसंच ऑनलाइन अर्ज भरणं आवश्यक आहे.
इंटर्नशिप स्कीम 3 ऑक्टोबरपासून सुरू :युवकांची रोजगारक्षमता आणि कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशानं पंतप्रधान इंटर्नशिप योजना 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलीय. ही एक वर्षाची इंटर्नशिप 21-24 वयोगटातील तरुणांनासाठी असेल. भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिप करता येणरा आहे. या उपक्रमाची पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. त्याच दिवशी सुरू होणाऱ्या इंटर्नशिप पोर्टलद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. आयआयटी किंवा आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे, परंतु औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि कौशल्य केंद्रांमधील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवड झालेल्या इंटर्नला मासिक स्टायपेंड मिळणार आहे. सरकारकडून तरुणांना 4 हजार 500 तसंच कंपन्यांकडून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीद्वारे 500 रक्कम देण्यात येईल. ही योजना दोन टप्प्यांत राबवली जाईल, पाच वर्षांमध्ये 10 दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल.
इंटर्नशिप योजनेचा उद्देश :युवा इंटर्नशिप योजनेचा मुख्य उद्देश भारतातील तरुणांना कॉर्पोरेट जगतात काही अनुभव मिळवून देण्यास मदत करणं आहे. या योजनेच्या मदतीनं तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारत सरकारच्या मते, योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना INR 5000 पर्यंत मासिक स्टायपेंड मिळेल. अर्जदारांना मासिक स्टायपेंड आणि INR 6000 चे एकवेळ आर्थिक सहाय्य मिळेल. निवडलेल्या तरुणांना भारतातील शीर्ष 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल. या योजनेमुळं बेरोजगार तरुणांना दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.
पात्रता निकष :
- पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 21 ते 24 दरम्यान असावं.
- अर्जदार पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
उमेदवारांनी त्यांचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा त्याच्या समकक्ष, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) किंवा त्याच्या समकक्ष पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक डिप्लोमा, किंवा BA, BSc, B.Com, BCA, BBA, किंवा B.Pharma.सारखी पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे.
अपात्रता निकष :
- पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षणात करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.
- IIT, IIM, राष्ट्रीय कायदा विद्यापीठं, IISER, NIDs किंवा IIIT मधील पदवीधर या योजनेसाठी पात्र नाहीत.
- सीए, सीएमए, सीएस, एमबीबीएस, बीडीएस, एमबीए, पीएचडी किंवा कोणतीही पदव्युत्तर पदवी धारकाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.
- कोणत्याही सरकारी कौशल्य, प्रशिक्षणार्थी किंवा इंटर्नशिप प्रोग्राममध्ये नोंदणी केल्यास तुम्ही अपात्र आहात.
- ज्यांनी NATS किंवा NAPS अंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली आहे, ते अर्ज करू शकत नाहीत.
- 2023-24 साठी तुमचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा अधिक असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीय.
कुटुंबातील कोणताही सदस्य (स्वतः, पालक, जोडीदार) जो कायम/नियमित सरकारी कर्मचारी असल्यास असे विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र असतील. (कंत्राटी कर्मचारी वगळून).
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचं वेळापत्रक :ही योजना अधिकृतपणे 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झालीय. कंपन्या 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध इंटर्नशिप पोझिशन्सची नोंदणी करू शकतात. हा कालावधी कंपन्यांना ते ऑफर करत असलेल्या इंटर्नशिपची जाहिरात करण्यास अनुमती देते.12 ऑक्टोबर 2024 पासून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी अर्ज अर्ज करता येणार आहे. इंटर्नशिप कार्यक्रम एकूण एक वर्ष चालेल. सहभागींना विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान मासिक स्टायपेंड मिळेल. या योजनेचे उद्दिष्ट पाच वर्षांमध्ये 10 दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण देण्याचं आहे. या योजनेची घोषणा 23 जुलै 2024 रोजी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान करण्यात आली होती. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना INR 5000 ची आर्थिक मदत 1 कोटी युवकांना दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पत्ता पुरावा
- पॅन कार्ड
- शिधापत्रिका
विमा संरक्षण :
प्रत्येक इंटर्नला सरकारी योजनांतर्गत विमा संरक्षण मिळेल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
या विमा पॉलिसींचा प्रीमियम सरकार भरणार आहे.
पंतप्रधान इंटर्नशिप योजना अर्ज प्रक्रिया :