हैदराबादPM Ujjwala Yojana : दिवाळीपूर्वी उत्तर प्रदेश सरकार महिलांना मोठी भेट देणार आहे. 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या सर्व लाभार्थ्यांना या दिवाळीत मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'X' वर पोस्ट करत माहिती दिलीय. यासोबतच दिवाळीपूर्वी सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळू शकेल. मात्र, या योजनेचा लाभ तुम्ही देखील तुमच्या राज्यात घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करसा करायचा पात्रता काय आहे? चला जाणून घेऊया..
90 कोटी 60 लाख कुटुंबांनी घेतला लाभ :पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या उद्देशाने मे 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार विश्वास आतापर्यंत देशातील सुमारे 90 कोटी 60 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचं उद्दिष्ट :
पर्यावरणाचं प्रदूषण कमी करणे : स्वयंपाकघरातील धूर कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून पर्यावरणाचं प्रदूषण देखील कमी करता येईल.
मोफत गॅस कनेक्शन : या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना प्रथमच मोफत गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह दिला जातो.
स्वस्त गॅस सिलिंडर : गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कमी किमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
उज्ज्वला योजना २.० आणि ३.० :पहिल्या टप्प्यातील यशानंतर सरकारनं उज्ज्वला योजना २.० सुरू केली. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकाच्या तिसऱ्या कार्यकाळात या योजनेला उज्ज्वला योजना 3.0 असं नाव देण्यात आलं. ज्यामध्ये प्रत्येक घरात गॅस सिलिंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
पंतप्रधान उज्ज्वला 3.0 गॅस कनेक्शन लाभार्थी :प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. उज्ज्वला योजना 3.0 अंतर्गत, प्रथमच महिलांना मोफत गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह देण्यात येत आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आता अर्ज करू शकता.
पात्रता निकष :
महिलांसाठीच योजना : या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
18 वर्षांपेक्षा जास्त वय :महिला अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.
भारतीय रहिवाशी : अर्ज करणारी महिला भारताची कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे.
शिधापत्रिका :अर्जदार महिलेकडं शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
एलपीजी कनेक्शन नसावं : अर्ज करण्यापूर्वी महिलेच्या घरात कोणतंही एलपीजी कनेक्शन असू नये.
उत्पन्न मर्यादा :वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु. 1 लाख आणि शहरी भागात रु. 2 लाखांपेक्षा जास्त नसावं.
आवश्यक कागदपत्रे :
अर्जदाराचे आधार कार्ड
• निवास प्रमाणपत्र
• जात प्रमाणपत्र