हैदराबाद POCO New Smartphone : POCO इंडिया डिसेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत दोन शक्तिशाली फोन POCO M7 Pro 5G आणि POCO C75 5G स्वस्त किंमतीत ऑफर करणार आहे. दरम्यान, पोको कंपनीचे प्रमुख हिमांशू टंडन यांनीही X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे या नवीनतम स्मार्टफोन्सच्या लॉंचची तारीख जाहीर केली आहे. टंडनच्या पोस्टनुसार, आगामी हँडसेट 17 डिसेंबर 2024 रोजी लॉंच होतील.
अधिक प्रीमियम वैशिष्ट्ये :आगामी POCO M7 Pro 5G आणि POCO C75 5G हँडसेटबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती समोर आलेली नाहीय. मात्र, टंडन यांनी केलेच्या पोस्टमुळं फोनच्या लॉंचची तारीख जाहीर झालीय. एका अहवालांनुसार, POCO 5G बजेट-अनुकूल ऑफर करेल अशी अपेक्षा आहे. कारण POCO ची सी-सिरीज परवडणाऱ्या किंमतीसाठी ओळखली जाते. POCO M7 Pro 5G अधिक प्रीमियम वैशिष्ट्ये शोधत असलेल्या ग्राहकांसाठी फायद्याचा असेल. कंपनी 5G कनेक्टिव्हिटीसह बजेट स्मार्टफोनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही फोन सादर करेल. POCO चा C65 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. त्यामुळं C75 5G फोन सी-सिरीजमध्ये समाविष्ट केला जाण्याची अपेक्षाी आहे. त्याचप्रमाणे, POCO M6 Pro 5G या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता.