हैदराबाद : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 19 व्या हप्त्याबाबत सरकारनं अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, परंतु फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर 2000 रुपय जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर द्यावी. तसंच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नसल्यास त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत.
आतापर्यंत 18 हप्ते जारी :2019 मध्ये सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पीएम किसान योजनेचे सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
19 वा हप्ता फेब्रुवारीत जमा होणार? : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांना पाठवते. सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवते. सरकार प्रत्येक हप्त्याच्या चार महिन्यांनंतर पुढील हप्ता जारी करतं. सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत. आता या योजनेच्या 19 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. भारत सरकारनं ऑक्टोबरमध्ये 18 वा हप्ता जारी के होताला. ऑक्टोबरपासून नंतर आता फेब्रुवारीमध्ये हप्ता जामा होण्याला चार महिने होणार आहेत. म्हणजेच किसान योजनेचा पुढील हप्ता नवीन वर्षाच्या पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो.
ई-केवायसी करणं गरजेचं : भारत सरकारनं पीएम किसान योजनेच्या खात्यात ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधीच माहिती दिली होती. मात्र असं असूनही आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलं नाही. या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पुढील हप्त्यापूर्वी न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.