महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

पिक्सेल आज स्पेसएक्सच्या रॉकेटमधून 3 हायपरस्पेक्ट्रल उपग्रह प्रक्षेपित करणार - HYPERSPECTRAL IMAGING SATELLITES

पिक्सेल आज स्पेसएक्स रॉकेटवरुन तीन हायपरस्पेक्ट्रल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे भारतातील अशा प्रकारचे पहिले खाजगी उपग्रह नेटवर्क आहे.

Hyper Spectral Satellites
हायपरस्पेक्ट्रल उपग्रह (Pixxel)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 14, 2025, 3:15 PM IST

हैदराबाद : बेंगळुरूस्थित स्टार्ट-अप पिक्सेल स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर-12 मोहिमेअंतर्गत कॅलिफोर्नियाहून तीन हायपरस्पेक्ट्रल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. याबद्दल पिक्सेलनं सांगितले की, सर्व उपग्रह पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर ते काम करण्यास सुरुवात करतील. या वर्षी प्रक्षेपित होणाऱ्या एकूण सहा उपग्रहांपैकी हे उपग्रह पहिले आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी तीन उपग्रह प्रक्षेपित केले जातील. हे उपग्रह 550 किमी उंचीवर सूर्य-समकालिक कक्षेत पाठवले जातील.

पिक्सेल, एक भारतीय अंतराळ स्टार्टअप आहे. आज स्पेसएक्स रॉकेटवर तीन हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह पिक्सेल प्रक्षेपित करणार आहे. हे भारतातील अशा प्रकारचे पहिले खाजगी उपग्रह नेटवर्क आहे. हे उपग्रह शेती, खाणकाम आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या अनुप्रयोगांसाठी वापरले जातील. - पिक्सेल

बेंगळुरूस्थित स्टार्ट-अप पिक्सेल स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर-12 मोहिमेअंतर्गत मंगळवारी कॅलिफोर्नियाहून तीन हायपरस्पेक्ट्रल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहांना 'फायरफ्लाय' असं नाव देण्यात आले आहे. प्रत्येका उपग्रहाचं वजन 60 किलो आहे.

प्रक्षेपणाबद्दलची महत्त्वाची माहिती

  • कंपनी : पिक्सेल
  • उपग्रह प्रकार : हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह
  • प्रक्षेपित उपग्रहांची संख्या : तीन
  • प्रक्षेपण वाहन : स्पेसएक्स रॉकेट
  • महत्त्व : भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार.

पिक्सेलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अवैस अहमद म्हणाले की, हे प्रक्षेपण भारतातील नवोदित खाजगी अवकाश क्षेत्रासाठी तसंच पिक्सेलसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. शेती, खाणकाम, पर्यावरणीय देखरेख आणि संरक्षण यासारख्या उद्योगांना सेवा देण्यासाठी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान वापरणार आहे. उपग्रह पीक उत्पादन सुधारण्यासाठी, संसाधन, तेल गळती, सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतं असं कंपनीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अहमद यांनी पुढं म्हटलंय की, "पिक्सेलनं रिओ टिंटो, ब्रिटिश पेट्रोलियम आणि भारताच्या कृषी मंत्रालयासह सुमारे 65 क्लायंटशी करार केला आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे अडीच तासांनी उपग्रहांशी पहिला संपर्क पिक्सेल साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे वाचलंत का :

  1. ह्युंदाई क्रेटाच्या विक्रीत 36% वाढ, डिसेंबर 2024 मध्ये ह्युंदाई मोटरचा किती झाला सेल?
  2. Nothing Phone 3 लवकरच लाँच होणार, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...
  3. Poco X7 Pro 5G सेल थोड्याच वेळात होणार सुरू, सेलमध्ये मिळवा बंपर सूट

ABOUT THE AUTHOR

...view details