हैदराबाद : Oppo ची बहुप्रतीक्षित Reno 13 5G मालिका भारतात 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता लाँच केली जाईल. या मालिकेत Oppo Reno 13 5G आणि Oppo Reno 13 Pro 5G यांचा समावेश असेल. ही सीरीज लवकरच निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. Oppo चा लॉंच इव्हेंट फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या ई-स्टोअरसह कंपनीच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल.
तीन रंगात येणार फोन : Reno 13 5G मालिका चीनमध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये डेब्यू झाली होती. आता ही सीरीज भारतीय व्हेरियंटमध्ये अनेक अपग्रेड्स येईल, अशी अपेक्षा आहे. फोन वेगळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतील. ओप्पो रेनो 13 आयव्हरी व्हाइट आणि ल्युमिनस ब्लूमध्ये उपलब्ध असेल, तर रेनो 13 प्रो ग्रेफाइट ग्रे आणि मिस्ट लॅव्हेंडरमध्ये सादर केला जाईल.
MediaTek Dimensity 8350 :Oppo Reno 13 5G 8GB RAM नं सुसज्ज असेल आणि 128GB आणि 256GB चे स्टोरेज पर्याय ऑफर करेल. दरम्यान, Oppo Reno 13 Pro 5G मध्ये 256GB आणि 512 GB च्या स्टोरेज पर्यायांसह 12GB RAM असण्याची अपेक्षा आहे. दोन्ही मॉडेल्स वर्धित कार्यक्षमतेसाठी Oppo च्या SignalBoost X1 चिप्ससह जोडलेले MediaTek Dimensity 8350 SoC द्वारे समर्थित असतील.