हैदराबाद :स्मार्टफोन कंपनी नथिंग आपला पहिला कम्युनिटी एडिशन स्मार्टफोन 30 ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार आहे. नथिंग फोन 2a कम्युनिटी एडिशनसाठी ग्राहकांकडून कल्पना मागवण्यात आल्या होत्या. यात अनेकांनी हार्डवेअर, वॉलपेपर, पॅकेजिंग डिझाइन आणि फोनच्या मार्केटिंग मोहिमेत भाग घेतला आहे. फोनच्या अंतिम डिझाइनमध्ये एक अद्वितीय "फॉस्फोरेसेन्स" संकल्पना आहे, ज्यामध्ये आकर्षक हिरवा रंग आहे. या रंगामुळं फोन अंधारातही चमकतोय.
चमकणार फायरफ्लाय डिझाइन : हा फोन तयार करण्यासाठी मार्चमध्ये सुरवात करण्यात आली होती. यामध्ये हार्डवेअर डिझाइन फायनल करण्यात आलं. यात मागील बाजूस चमकदार रेडियम पॅटर्न कंपनीनं दिला आहे. नवीन फोनच्या लॉंच टीझरमध्ये मागील बाजूस एक चमकणारा फायरफ्लाय डिझाइन देखील पहायला मिळतंय. या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 6.7-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे. नवीन Phone 2a आवृत्ती बाहेरून वेगळी दिसत असली तरी ती या वर्षी मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या मानक Nothing Phone (2a) सारखीच असण्याची अपेक्षा आहे. बेस मॉडेलमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले ॲडॉप्टिव्ह 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 7200 Pro SoC होता.