हैदाराबाद Nobel Prize in Chemistry :रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना प्रथिने संशोधनासाठी जाहीर करण्यात आलं आहे. रसायनशास्त्रातील 2024 चे नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर यांना "कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइनसाठी" आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना "प्रोटीन संरचनासाठी" जाहीर करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेसनं बुधवारी ही घोषणा केलीय.
प्रथिनांची रहस्ये उघड : रसायनशास्त्रातील या वर्षीचे नोबेल पारितोषिक विजेत्यांनी संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रथिनांची रहस्ये उघड केली आहेत. 2024 रसायनशास्त्र विजेते डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांनी जवळजवळ सर्व ज्ञात प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वीपणे वापर केला आहे. या वर्षीचे रसायनशास्त्र विजेते डेव्हिड बेकर यांनी जीवनाच्या बिल्डिंग ब्लॉक्सवर प्रभुत्व कसं मिळवायचं आणि पूर्णपणे नवीन प्रथिने कशी तयार करायची, हे शिकलं आहे. त्यांच्या शोधांची क्षमता प्रचंड आहे, असं अकादमीनं म्हटलंय.