हैदराबाद :Motorola च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी भारतात आपला नवीन फोन - Motorola G35 5G लॉंच करणार आहे. फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे. यामध्ये कंपनीनं फोनच्या लॉंच डेटची घोषणा केलीय. मायक्रोसाइटनुसार, हा मोटोरोला फोन 10 डिसेंबर रोजी भारतात लॉंच होणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला तीन रंग पर्याय मिळेल. यात हिरवा, लाल आणि काळा रंग असेल.
50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा :नवीन फोनचा मागील पॅनल शाकाहारी लेदर डिझाइनचा असेल. या मायक्रोसाइटवर फोनच्या खास फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे. यानुसार, फोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह फुल एचडी + डिस्प्ले, डॉल्बी ॲटमॉस साउंड आणि 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह अनेक छान वैशिष्ट्ये ऑफर करणार आहे.
Motorola G35 5G ची वैशिष्ट्ये : फ्लिपकार्ट मायक्रोसाइटनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देणार आहे. हा डिस्प्ले 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येईल. हा डिस्प्ले व्हिजन बूस्टर तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे. कंपनी या डिस्प्लेमध्ये 60Hz ते 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश दर देणार आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी तुम्हाला त्यात गोरिल्ला ग्लास 3 देखील पाहायला मिळेल. हा फोन 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल.