ETV Bharat / state

जळगाव रेल्वे अपघातानं जागवल्या मुंबई अपघाताच्या स्मृती; महिलांच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं घेतला 49 महिलांचा बळी - MUMBAI LOCAL TRAIN ACCIDENT IN 1993

जळगाव इथल्या परधाडे गावाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात 13 प्रवाशांचा बळी गेला आहे. मात्र या रेल्वे अपघातानं मुंबईत 1993 साली झालेल्या घटनेच्या वेदना ताज्या झाल्या आहेत.

Mumbai Local Train Accident In 1993
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 2:18 PM IST

मुंबई : जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानं रेल्वेतील प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्या. मात्र समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडल्यानं त्यातील 13 निष्पापांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे मुंबईत तीन दशकांपूर्वी घडलेल्या भयानक दुर्घटनेचे जुन्या मुंबईकरांना स्मरण झालं. त्या दुर्घटनेत तब्बल 49 महिलांना प्राण गमवावे लागले होते. महिलांच्या डब्यात आग लागल्याची अफवा सरली आणि पाहता पाहता महिलांनी बाहेर उड्या घेतल्या. या अपघातात तब्बल 49 महिलांचा बळी गेला होता.

मुंबईत लोकलमधून उड्या मारल्यानं 49 महिला प्रवाशांचा बळी : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातून लेडीज स्पेशल उपनगरीय लोकल बोरीवलीच्या दिशेनं निघाली. मात्र त्या लोकलमधील 49 महिला प्रवाशांचा शेवटचं स्थान गाठण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. बोरीवली स्थानक येण्यापूर्वी लोकल कांदिवली स्थानकापुढं गेली. यावेळी त्या लोकलमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. आगीची अफवा पसरताच महिला प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. महिला प्रवाशांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी वेगात असलेल्या धावत्या लोकलमधून उड्या मारल्या. प्रत्येक जण जीवाच्या आकांतानं लोकलबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र दुर्दैवानं त्यांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' सापडल्यासारखी झाली. समोरील दिशेनं आलेल्या लोकलनं या रुळांवर उड्या मारलेल्या महिलांना चिरडलं. त्यावेळी पावसानं देखील रौद्र रुप धारण केलं. या दुर्घटनेत 49 महिलांना जीव गमवावा लागला.

धूर येताना पाहिला अन् ठोकली आग लागल्याची ओरड : त्या लोकलमधील एका प्रवासी महिलेनं धूर येत असताना पाहिलं अन् आग लागल्याची ओरड ठोकली. आगीच्या शक्यतेनं महिला प्रवाशांची डब्यामध्ये पळापळ झाली. त्यापैकी काहींनी साखळी ओढून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकल न थांबल्यानं शेवटी त्या प्रवासी महिलांनी डब्याबाहेर उडी मारण्याचा पर्याय स्वीकारला आणि तोच जीवघेणा ठरला. जळगाव इथं झालेल्या अपघातात पुष्पक एक्सप्रेसच्या चालकानं ब्रेक लावल्यानं ठिणग्या उडाल्या. त्यातून आग लागल्याची अफवा पसरली. मात्र या अफवेनं तब्बल 13 प्रवाशांचा बळी घेतला. मात्र जळगाव रेल्वे अपघातानं मुंबईत झालेल्या 49 महिला प्रवाशांच्या मृत्यूचे घाव ताजे झाले आहेत.

हेही वाचा :

  1. जळगाव रेल्वे अपघात: मृतांचा आकडा वाढला, मृत प्रवाशांची नावं आली समोर, नेपाळमधील 'इतक्या' प्रवाशांचा समावेश
  2. चहावाल्याने आग लागल्याची ओरड दिली अन्...निव्वळ अफवेनं ही घटना घडली, अजित पवारांची प्रतिक्रिया
  3. जळगाव रेल्वे अपघातात किमान १२ ठार, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी एका रेल्वेतून मारल्या उड्या, दुसऱ्या रेल्वेने चिरडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.