महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

आधार, पॅन कार्डबाबत केंद्र सरकाचा मोठा निर्णय; उचललं 'हे' पाऊल - Aadhaar PAN Card - AADHAAR PAN CARD

Aadhaar PAN Card : आधार, पॅन कार्डचा तपशील गोळा करून भारतीय नागरिकांची वैयक्तिक ओळख उघड करणाऱ्या काही वेबसाइट्स केंद्र सरकारनं ब्लॉक केल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. CERT-In ला या वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या.

Aadhaar card
प्रातिनिधिक फोटो (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 28, 2024, 3:38 PM IST

हैदराबादAadhaar PAN Card :आधार, पॅन कार्ड तपशीलांसह भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करणाऱ्या काही वेबसाइट सरकारनं ब्लॉक केल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला या वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या. त्यानंतर सरकारनं या वेबसाइट्स ब्लॉक केल्या.

सायबर सुरक्षा :सरकारनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, काही वेबसाइट भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्ड तपशीलांसह संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करत आहेत. सरकार सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्यानं ही बाब गांभीर्यानं घेण्यात आली आहे. त्यानुसार या वेबसाइट्स ब्लॉक करण्याची तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.

सुरक्षेतील त्रुटी उघड, तक्रार दाखल :युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नं आधार कायदा, 2016 अंतर्गत आधारशी संबंधित तपशील सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्यावरील बंदीचं उल्लंघन केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडं तक्रार दाखल केली आहे. CERT-In नं या वेबसाइट्समधील काही सुरक्षा त्रुटी उघड केल्या आहेत. त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित वेबसाइट मालकांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

भरपाईची मागणी :माहिती तंत्रज्ञान कायदा, 2011 अंतर्गत सार्वजनिक संवेदनशील वैयक्तिक माहिती देणे प्रतिबंधित आहे. कोणही तक्रार दाखल करण्यासाठी तसचं नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्याकडं संपर्क साधू शकता. राज्यांच्या आयटी सचिवांना निर्णय घेणारे अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत.

हे वाचलंत का :

  1. तुमचा मोबाईल फोन स्लो चार्ज होतोय?, बॅटरी बॅकअप कमी होण्याचं कारण काय? - Why Mobile Phone Charging Slowly
  2. आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - PM SURYA GHAR MUFT BIJLI YOJANA
  3. सेकंड हँड कार खरेदी 'ही' काळजी घ्या, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई - Second hand car buying tips

ABOUT THE AUTHOR

...view details