हैदराबादMGNREGA Job Card : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA ) ग्रामीण नागरिकांना रोजगाराची हमी देतो. मनरेगा जॉब कार्डसाठी अर्ज करणं आता पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (MGNREGA) सरकार ग्रामीण भागातील बेरोजगारांना 100 दिवसांची रोजगार हमी देते. जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा अंतर्गत काम करत असाल, तर तुमच्याकडं मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करेल. तसंच तुमच्या कामाची नोंद त्यामध्ये केली जाईल, जेणेकरून तुम्ही केलेल्या कामाची संपूर्ण नोंद सरकारकडं असेल. आज आपण जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा?, त्यासाठी काय पात्रता आहे? आवश्यक कागदपत्राची तपशीलवार माहिती पाहणार आहोत.
NREGA जॉब कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा : सर्वप्रथम तुम्हाला उमंग किंवा उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला नोंदणी किंवा लॉगिन करावं लागेल. मनरेगा "जॉब कार्ड अर्जावर क्लिक करा. तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची सामान्य माहिती आणि कुटुंबप्रमुखाचं नाव, शिधापत्रिका क्रमांक इत्यादी भरावं लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल आणि “Apply for Job Card” वर क्लिक करा. यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल.