हैदराबादMG Cyberster : गेल्या काही वर्षांपासून, भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या (EVs) मागणीत सातत्यानं वाढ होत आहे. ही मागणी लक्षात घेता, आघाडीची कार उत्पादक JSW MG Motor India आपली नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार MG Cyberster असेल. कंपनी जानेवारी 2025 मध्ये भारतात MG Cyberster लाँच करणार आहे. MG च्या आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारच्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती घेऊया....
रिटेल चॅनलची घोषणा :MG ची आगामी इलेक्ट्रिक कार कंपनीच्या प्रीमियम निवडक रिटेल चॅनलद्वारे विकली जाईल. JSW MG Motor India नं काही महिन्यांपूर्वी प्रिमीयम ऑफरसाठी MG Select नावाच्या एका नवीन रिटेल चॅनलची घोषणा केली होती. आगामी एमजी सायबरस्टर हे या प्रीमियम डीलरशिप साखळीद्वारे किरकोळ विक्री होणारं पहिलं उत्पादन असेल. कंपनीनं सर्वप्रथम 2023 गुडवुड फेस्टिवल ऑफ स्पीडमध्ये सायबरस्टरचं प्रदर्शन केलं होतं. आगामी इलेक्ट्रिक कारची लांबी 1,533 मिमी, रुंदी 1,912 मिमी आणि उंची 1,328 मिमी असेल आणि तिचा व्हीलबेस 2,689 मिमी असेल.