हैदराबाद Meta Scam se Bacho Campaign :ऑनलाईन घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी Meta नं भारत सरकारसोबत हातमिळवणी केलीय. इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) यांच्यासह मेटा नागरिकांना ऑनलाइन घोटाळ्यापासून बचावासाठी शिक्षित करणार आहे. यासाठी मेटानं आपली सुरक्षा मोहीम 'Scam se Bacho' सुरू केली आहे.
नागरिकांना करणार शिक्षित : मेटा यांनी संयुक्त उपक्रम सुरू केला. देशातील वाढते ऑनलाईन घोटाळे तसंच सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी Meta नं गुरुवारी दिल्लीत आपल्या दोन महिन्यांच्या मोहिमेची सुरवात केलीय. ज्यामध्ये 9 भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल संदेश देण्यात आला. 'एकात्मिक राष्ट्रीय ग्राहक जागरुकता मोहीम, दूरदर्शनवरील माहितीपूर्ण टॉक शो आणि देशभरातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेलं प्रशिक्षण सत्र आहे.'
भारतीयांना सक्षम करण्यासाठी पुढाकार : राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ करताना, Meta नं बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना यांची भुमीका असलेला एक शैक्षणिक चित्रपट प्रदर्शित केलाय. जो ऑनलाईन घोटाळ्यांपासून लोकांना सावध राहण्याचं आवाहन करतोय. हा चित्रपट फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर उपस्थित असलेल्या अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकतोय. त्यामुळं वापरकर्त्यांना त्यांच्या ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवता येतं.
ऑनलाइन घोटाळ्यांपासून संरक्षण करण्याची तयारी : ही मोहीम टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, ब्लॉक आणि रिपोर्ट, व्हॉट्सॲपची ग्रुप प्रायव्हसी सेटिंग, ऑनलाइन घोटाळे, फसवणूक आदी सुरक्षा उपायाबाबत संरक्षण करण्यात मदत करणार आहे. याव्यतिरिक्त Meta च्या सुरक्षा साधनांचा वापर करून नागरिक स्वतःचं संरक्षण कसं करू शकतात, याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी Meta Instagramसोबत कार्यक्रम राबवणार आहे.
हे वाचलत का :
- नविन बजाज पल्सर N125 टीझर रिलीज, दुचाकीत काय असेल खास?
- Infinix चा सर्वात हलका Inbook Air Pro Plus लॅपटॉप लॉंच : Copilot AI बटणासह 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- OnePlus OxygenOS 15 अपडेट्स पुढील आठवड्यात होणार रिलीज