बुलावायो ZIM vs PAK 1st ODI Live Streaming : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 24 नोव्हेंबर 2024 रोजी खेळवला जाणार आहे. क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं हा सामना आयोजित केला जाईल. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान या महिन्याच्या सुरुवातीला वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 नं पराभूत केल्यानंतर या सामन्यात उतरेल आणि झिम्बाब्वेविरुद्ध फेव्हरिट आहे.
Turning up the energy ⚡
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 23, 2024
Fielding Coach Mohammad Masroor gives a rundown of the drills 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/QgQ2TM78R1
पाकिस्तानच्या दिग्गजांना विश्रांती : पाकिस्तानचा संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना सहा सामन्यांच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे, झिम्बाब्वेवर विजय मिळविण्यासाठी पुरेशी आहे. झिम्बॉब्वे संघाकडून क्रेग एर्विन वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व करणार आहे. अनुभवी अष्टपैलू शॉन विल्यम्ससह प्रमुख खेळाडू सिकंदर रझा याच्या समावेशामुळं त्यांची फळी मजबूत झाली आहे आणि त्यांना पाकिस्तानला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे एकूण 62 वनडे सामने झाले. यात पाकिस्ताननं 54 सामने जिंकत एकहाती वर्चस्व राखलं आहे. तर झिम्बाब्वे संघानं 5 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एका सामना टाय झाला आहे.
Focused 🎯
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 23, 2024
Training mode 🔛 for the ODI leg of the Zimbabwe tour 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/XkfbTWb0yX
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना, 24 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- दुसरा वनडे सामना, 26 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- तिसरा वनडे सामना, 28 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात पहिला वनडे कधी होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना रविवारी (24 नोव्हेंबर 2024) होणार आहे.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
📹 A peek into the Pakistan ODI squad's pre-series broadcast photoshoot from Zimbabwe 🎬#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/ElvqrPEmH4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 22, 2024
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता खेळवला जाईल?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 1.30 वाजता होईल.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपित होणार नाही.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी, झिम्बाब्वेच्या 2024 च्या पाकिस्तान दौऱ्याचं कोणतंही अधिकृत थेट प्रक्षेपण होणार नाही. तरी भारतातील चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहु शकता.
Turning up the energy ⚡
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 23, 2024
Fielding Coach Mohammad Masroor gives a rundown of the drills 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/QgQ2TM78R1
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवनाशे मारुमनी, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्डन, रिकान मायडर्स, डिओन मायडर्स. विल्यम्स.
पाकिस्तान संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (कॅण्ड विकेट), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज दहनी, तय्यब ताहिर.
हेही वाचा :