हैदराबाद : मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अखेर भारताची माफी मागितलीय. त्यांनी कोविड-१९ साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनावरून भारतासह अनेक देशांमधील सत्ताधारी निवडणुका हरल्याचा दावा केला होता. त्यांच्या टीकेनंतर कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग भारताची माफी मागितली आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतात एकच खळबळ उडाली होती. अश्विनी वैष्णव यांनी एक्स वर पोस्ट करून मेटावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याच वेळी, माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनीही मेटावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
मेटा सीईओ जो रोगन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये झुकरबर्ग म्हणाले, '2024 हे वर्ष निवडणुकीसाठी महत्त्वाचं होतं. कोविड-19 मुळं, बहुतेक देशांमधील सत्ताधारी पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. भारत देखील त्यापैकी एक आहे. त्यांनी कोविड-19 साथीच्या आजाराचं व्यवस्थापन आणि त्यामुळे उद्भवणारे आर्थिक संकट हे सरकारांवरील अविश्वासाचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं होतं.
मेटाचा माफीनामा
मार्क झुकरबर्गच्या या विधानानंतर, मेटा इंडियानं लगेचच प्रतिक्रिया दिली देत माफी मागितली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी लिहिलं की, '२०२४ मध्ये अनेक देशांच्या सत्ताधारी पक्षांनी निवडणुका गमावल्या, हे मार्क यांचं विधान अनेक देशांना लागू होऊ शकतं, पण भारताला हे विधान लागू होत नाही.' भाजप खासदार निशिकांत दुबे, यांनी या मुद्द्यावर मेटाला खडे बोल सुनावले होते. मार्क यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 'ते म्हणाले की अशा टीका कोणत्याही लोकशाही देशाची प्रतिमा कलंकित करतात. या चुकीबद्दल मेटाला भारतीय संसद आणि देशातील जनतेची माफी मागावी लागेल'.
META साठी भारत का महत्त्वाचा आहे?
मेटा इंडिया भारताला त्यांच्या महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक मानतो. ठुकराल म्हणाले की, कंपनी भारताच्या डिजिटल आणि नाविन्यपूर्ण क्षमतेशी जोडलेली आहे.
हे वाचलंत का :
- NEET UG 2025 नोंदणीमध्ये आधार कार्ड अपार कार्डशी जोडण्याची NTAची सूचना
- REDMI Note 14 मालिका पाच प्रकारांमध्ये लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींचे संपूर्ण विश्लेषण
- भारतात लाँच होण्यापूर्वीच होंडा CB650R चा टीझर जारी, अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन जाणून घ्या...