ETV Bharat / technology

NEET UG 2025 नोंदणीमध्ये आधार कार्ड अपार कार्डशी जोडण्याची NTAची सूचना - NEET UG 2025 REGISTRATION PROCESS

NEET UG 2025 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी, एनटीएनं अर्ज करताना अपार आयडी आणि आधार कार्डबाबत नविन सुचना जारी केलीय.

NEET UG 2025
NEET UG 2025 (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 4:36 PM IST

हैदराबाद : शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (अंडरग्रेजुएट) NEET (UG)-२०२५ नोंदणी प्रक्रियेसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. नविन सुचनेनुसार, APAAR आयडी (ऑटोमेटेड परमनंट अकादमिक अकाउंट रजिस्ट्री) परीक्षा प्रक्रियेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. अर्ज आणि परीक्षेच्या टप्प्यांमध्ये APAAR आयडी आणि आधार-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

एजन्सीनं म्हटलं आहे की, "नीट यूजीसाठी अर्ज करताना, विद्यार्थ्यांनी प्रमाणीकरणासाठी त्यांचे आधार कार्ड आणि अपार आयडी वापरावे. एनटीएने त्यांच्या वेबसाइट neet.nta.ac.in वर ही सूचना जारी केली आहे. एनटीए लवकरच नीट यूजी २०२५ साठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करेल". शिक्षण मंत्रालयाच्या सूचनांनुसार, NEET UG 2025 ला Apaar ID शी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

आधार कार्ड करा अपडेट
एनटीएनं नीट यूजीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांचं आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. उमेदवाराचं नाव, जन्मतारीख आणि आधार कार्डवरील इतर माहिती दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असावी. आधार कार्डला वैध मोबाईल नंबरशी लिंक करणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून ओटीपी पडताळणी प्रक्रिया सहज करता येईल.

आधार कार्ड का आवश्यक आहे?

NEET UG 2025 मध्ये आधार कार्ड का आवश्यक आहे, हे NTA नं स्पष्ट केलं आहे. एजन्सीनं यासाठी पाच कारणं दिली आहेत.

सोपी अर्ज प्रक्रिया : एनटीए म्हणतं की, आधार कार्ड वापरल्यानं माहिती आपोआप भरण्यास मदत होते. त्यामुळं अर्ज करताना तुम्हाला कमी माहिती भरावी लागते.

परीक्षा प्रक्रियेत सुधारणा : आधार-आधारित तंत्रज्ञानाच्या विकासासह, उमेदवारांची ओळख UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशनद्वारे जलद आणि सुरक्षितपणे पडताळली जाऊ शकते.

उपस्थिती पडताळणी : परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना उमेदवारांचे चेहरे त्वरित ओळखले जातात.

उमेदवारांचं प्रमाणीकरण : आधार कार्ड प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करते. यामुळं उमेदवारांची ओळख वेगळीच होते. जेणेकरून परीक्षेच्या काळात त्याचे हित जपता येईल.

APAAR आयडी आणि आधारचे फायदे
APAAR आयडी आधारसह एकत्रित केल्यानं परिक्षा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. यामुळं केवळ पडताळणीचे टप्पे सोपे होत नाही, तर परीक्षेची विश्वासार्हता वाढवते. आधारचा प्राथमिक ओळखपत्र म्हणून वापर करून, परीक्षा अधिकारी उमेदवारांना योग्यरित्या ओळखू शकतात, ज्यामुळं फसवणूक लक्षणीयरीत्या कमी होते. अधिक माहिती हवी असलेले उमेदवार नोंदणी प्रक्रिया आणि आधार एकत्रीकरणाबाबत मदतीसाठी 011-40759000वर NTA हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा neetug2025@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.

तुमचं आधार कार्ड कसं अपडेट करावं
खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची ओळख, पुरावा आणि पत्ता कागदपत्रे myAadhaar पोर्टलवर मोफत अपडेट करू शकता.

1 : myAadhaar पोर्टलवर जा.

2 : Enter Option वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि 'ओटीपी पाठवा' पर्यायावर क्लिक करा. एकदा तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त झाल्यावर, तो प्रविष्ट करा आणि एंटर पर्यायावर क्लिक करा.

3 : सूचना वाचल्यानंतर पुढील पर्यायावर क्लिक करा.

4: आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफसाठी कागदपत्रं अपलोड करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचं आधार कार्ड विनामूल्य अपडेट केलं जाईल. यानंतर, तुमचं अपडेट केलेलं आधार कार्ड सात दिवसांत अपडेट केलं जाईल.

हे वाचलंत का :

  1. सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शेवटी संधी, वेळ संपण्यापूर्वी 'असा' करा अर्ज
  2. RRB तंत्रज्ञ ग्रेड 3 भर्ती परीक्षा 2024 ची उत्तर की प्रसिद्ध, 'या' लिंकवरून उत्तर की करा डाउनलोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.