ETV Bharat / technology

भारतात लाँच होण्यापूर्वीच होंडा CB650R चा टीझर जारी, अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन जाणून घ्या... - HONDA CB650R TEASER RELEASED

होंडा टू व्हीलर्स इंडियानं त्यांच्या नवीन मोटरसायकल, HONDA CB650R चा नवीन टीझर जारी केला आहे. ही मोटरसायकल लवकरच भारतात लाँच होणार आहे.

honda cbr650r
होंडा CB650R (Honda India)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 15, 2025, 3:03 PM IST

Updated : Jan 15, 2025, 3:08 PM IST

हैदराबाद : होंडानं त्यांच्या सोशल मीडियावर 2025 CB650R च्या भारतातील लाँचची माहिती दिली आहे. ही मोटरसायकल दिल्लीतील इंडिया मोबिलिटी 2025 मध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर किंमतीची घोषणा नंतर केली जाईल.

फोर-सिलेंडर इंजिन
होंडा CB650R मध्ये 649 cc लिक्विड-कूल्ड इनलाइन फोर-सिलेंडर इंजिन आहे. ते 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. इंजिनचं पॉवर आउटपुट सुमारे 95 bhp असून हे इंजन सुमारे 63 Nm टॉर्क आउटपुट निर्माण करतं.

Honda CB650R मध्ये काय आहे हार्डवेअर?
होंडा CB650R मध्ये स्टील डायमंड फ्रेम वापरली आहे. ही फ्रेम 41 मिमी शोवा सेपरेट फंक्शन बिग पिस्टन फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉकनं सस्पेंड केलेली आहे. ज्यामध्ये 10 स्टेप्स ॲडजस्टेबिलिटी आहे. या दुचाकीला समोरील बाजूस 310 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक मिळणार आहे. ड्युअल-चॅनेल ABS आणि स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल यात ऑफर केले जातील.

Honda CB650R ची वैशिष्ट्ये
Honda CB650R मध्ये रायडरसाठी 5-इंचाचा TFT स्क्रीन येतो. या स्क्रीनला ब्लूटूथ वापरून स्मार्टफोनशी जोडता येतं. स्क्रीन टेक्स्ट मेसेज आणि कॉलसाठी सूचना अलर्ट दाखवू शकतं. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील यात ऑफर केलं आहे.

Honda CB650Rचा रंग
Honda CB650R फक्त एकाच रंगात लॉंच होण्याची अपेक्षा आहे. ही दुचाकी पर्ल स्मोकी ग्रे रंगात लॉंच होऊ शकते. 2024 मध्ये, होंडानं नवीन CB650R आणि CBR650R मोटरसायकलसह ई-क्लच तंत्रज्ञान सादर केलं होतं. या तंत्रज्ञानामुळं, रायडरला थांबताना किंवा गीअर्स बदलताना देखील क्लच लीव्हर वापरावा लागत नाही. सध्या तरी, सी-क्लच व्हर्जन भारतीय बाजारात येईल की नाही हे निश्चित झालेलं नाही.

Honda CBR650R किंमत
2025 होंडा CB650R ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते, कारण मागील मॉडेल भारतात बंद होण्यापूर्वी या मॉडेलची किंमत 9.15 लाख रुपये होती. होंडा केवळ भारतीय बाजारात सीबी650 आर लॉंच करणार नाही, तर कंपनी सीबीआर650 आर देखील लॉंच करणार आहे. ही होंडाची पूर्णपणे फेअर केलेली स्पोर्टबाईक आहे. यात सीबी650 आर सारखीच मूलभूत वैशिष्ट्ये मिळतील.

हे वाचलंत का :

  1. Honda Elevate Vs Hyundai Creta च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींचं संपूर्ण विश्लेषण, कोणती कार आहे सर्वात बेस्ट?
  2. ह्युंदाई क्रेटाच्या विक्रीत 36% वाढ, डिसेंबर 2024 मध्ये ह्युंदाई मोटरचा किती झाला सेल?
  3. भारतीय रेल्वेचा नवा विक्रम : जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे इंजिन विकसित, काय आहेत हायड्रोजन इंधनाचे फायदे तोटे?

Last Updated : Jan 15, 2025, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.