हैदराबादIIT GUWAHATI :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), गुवाहाटीनं विद्यार्थ्य्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. IIT विद्यार्थ्य्यांच्या प्रवेशासाठी सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी अनिवार्य केलीय आहे. या वर्षी आयआयटी कॅम्पसमध्ये एकूण ती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अलीकडेच, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला संगणक विज्ञान शाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. तसंच विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यासाठी योग्य आधार देण्याची मागणी केली होती.
वैद्यकीय तपासणी अनिवार्य :आता संस्थेनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, यातील अनेक घटना (आत्महत्या) गैर-शैक्षणिक स्वरूपाच्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी उत्तम सपोर्ट सिस्टीम आणि प्रतिबंधात्मक उपायांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी आयआयटी गुवाहाटीनं अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मुक्त संवाद, प्रगत समुपदेशन सेवा, प्राध्यापक सल्लागार प्रणाली, सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. IIT गुवाहाटी प्रवेशाच्या वेळी एक वेळ अनिवार्य वैद्यकीय तपासणी सुरू करत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आवश्यक काळजी सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.