हैदराबाद Scorpio Classic Boss Edition :भारतात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यावेळी महिंद्रानं आपल्या स्कॉर्पिओचं क्लासिक बॉस एडिशन लॉंच केलंय. यात खास बदल देखील तुम्ही पाहू शकता. Mahindra Scorpio Classic Boss Edition मध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.
काय आहेत बदल : महिंद्रानं स्कॉर्पिओ क्लासिक बॉस एडिशन लॉंच केलंय. नवीन बॉस एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक बॉस एडिशन इतरांपेक्षा वेगळी दिसण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. याला फ्रंट ग्रिल, हेडलाइट्स, फॉग लाइट्स, बोनेट स्कूप, डोअर हँडल आणि मागील टेल लाइट्सभोवती गडद क्रोम मिळतोय. यात सिल्व्हर स्किड प्लेटसह फ्रंट बंपर एक्स्टेन्डर देखील आहे. इतकंच नाही तर बॉस एडिशनमधील ORVM ला कार्बन फायबर फिनिश देण्यात आलं आहे. यासोबतच बॉस एडिशनमध्ये डोअर व्हिझर आणि रिअर बंपर प्रोटेक्टर यांसारख्या इतर ॲक्सेसरीज देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच अपहोल्स्ट्रीसाठी ब्लॅक थीम देण्यात आली आहे. त्याचा डॅशबोर्ड अजूनही ड्युअल-टोन ब्लॅक आणि बेज कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे. या एडिशनमध्ये नेक कुशन आणि पिलो देण्यात आले आहेत.
इंजिन पॉवर :Mahindra Scorpio Classic Boss Edition मध्ये 2.2-litre mHawk डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 3,750 rpm वर 130 bhp कमाल पॉवर आणि 1,600-2,800 rpm वर 300 Nm चं पीक टॉर्क जनरेट करतं. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. मात्र यात तुम्हाला स्वयंचलित ट्रांसमिशन आणि 4x4 ड्राइव्हट्रेन मिळणार नाहीय.