हैदराबाद LinkedIn adds 10 new language :सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइननं चार भारतीय प्रादेशिक भाषांसह 10 नवीन भाषाचे पर्याय जोडले आहेत. यात चार भारतीय भाषांचा समावेश आहे. बंगाली, मराठी, तेलगू, पंजाबी या चार भारतीय प्रादेशिक भाषांसह व्हिएतनामी, ग्रीक, पर्शियन, फिन्निश, हिब्रू, हंगेरियन हे नवीन भाषा पर्याय देण्यात आले आहेत. नवीन भाषामुळं हिंदीसह पाच भारतीय भाषांना LinkedIn सपोर्ट करेल, असं एका निवेदनात म्हटलं आहे.
LinkedInवर पाच भारतीय भाषांचा समावेश : नव्यानं समाविष्ट केलेल्या भाषांमध्ये व्हिएतनामी, पर्शियन, ग्रीक, हिब्रू, फिनिश आणि हंगेरियन यांचा समावेश आहे. तसंच बंगाली, मराठी, पंजाबी, तेलगू या भारतीय भाषात वापरकर्त्यांना आता लिंकडइन वापरता येणार आहे. LinkedIn आधीपासूनच हिंदीला भाषेला सपोर्ट करतंय, ज्यामुळं प्लॅटफॉर्मवर भारतीय भाषांची एकूण संख्या पाच झाली आहे.
एकूण 26 भाषांचा वापर :या भाषांमुळं लिंक्डइनवर प्लॅटफॉर्मवर आता एकूण 26 भाषांचा वापर होत आहे. जगभरातील व्यावसायिकांना अधिक प्रभावीपणे कनेक्ट होण्यास, संवाद साधण्यास यामुळं मदत होणार, असं लिंक्डइनचे मुख्य उत्पादन अधिकारी टोमर कोहेन यांनी म्हटलं आहे.
अशी बदला लिंक्डइनवर भाषा : तुमच्या डिव्हाइसवर वेबपेज किंवा ॲप उघडा, 'सेटिंग्ज आणि गोपनीयता' वर जा, किंवा पेजच्या फूटरवरील 'भाषा' लिंक दाबा. भाषा बदलल्यानं काही घटक बदलतील, सर्व भाषा LinkedIn जाहिराती, उत्पादनं, मदत केंद्र, ग्राहक सेवा आणि मोबाइल ॲपसाठी समर्थित नाहीय. सध्या, LinkedIn चे भारतात 135 दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य आहेत. यात दर दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढ होत आहे. ज्यामुळं देश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची दुसरी सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ बनत आहे.
हे वाचलंत का :
- AI वैशिष्ट्यांसह सॅमसंगचे दोन टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या किंमत... - Samsung Galaxy Tablets
- आत्महत्या प्रकरणानंतर आयआयटीत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, प्रवेशावेळी वैद्यकीय तपासणी अनिवार्य - IIT GUWAHATI
- राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार मोफत; पात्रता, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही - Mukhyamantri Annapurna Yojana