महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

लावाचा धमाका ! Lava Yuva 4 भारतात लॉंच, 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा स्टायलिश फोन - LAVA YUVA 4 LAUNCH

Lava Yuva 4 launch : लावानं 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत सर्वात स्टायलिश फोन लॉंच केलाय. यात तुम्हाला 50MP कॅमेऱ्यासह मोठी बॅटरी मिळतेय.

Lava Yuva 4
Lava Yuva 4 (Lava)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 28, 2024, 4:21 PM IST

हैदराबाद Lava Yuva 4 launch : Lava नं आपला नवीन फोन Lava Yuva 4 लाँच केला आहे. हा फोन नवीन स्मार्टफोनअतिशय वेगवान असून दिसायला छान आहे. त्याची किंमत फक्त 6 हजार 999 आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 4GB RAM + 128GB स्टोरेज पर्याय मिळताय. तुम्ही आजपासून (28 नोव्हेंबर) लावा स्टोअरमध्ये हा फोन खरेदी करू शकता.

तीन रंगात उपलब्ध :या फोनमध्ये UNISOC T606 चिपसेट आहे. तो सी व्हाइट, ग्लॉसी पर्पल, ई आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. चला जाणून घेऊया लावा युवा 4 बद्दल तपशील.....

लावा युवा 4 : Yuva 4 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 16.55 सेमी (6.56 इंच) HD+ पंच-होल डिस्प्ले आहे. यामुळं वापरकर्त्यांना चित्रपट पाहताना चांगला अनुभव मिळतो. यात UNISOC T606 चिप असून या चिपमुळं फोन वेगानं चालतो. तसंच फोन हाताळनं अतिशय स्मूथ बनतं.

लावा युवा 4 बॅटरी :या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही फोन वारंवार चार्ज न करता बराच काळ वापरू शकता. फोनमध्ये 4GB+4GB रॅम आणि 64GB किंवा 128GB स्टोरेज पर्याय आहेत, त्यामुळं तुमच्याकडे भरपूर जागा असेल. हा फोन नवीनतम Android 14 वर चालतो आणि त्याचा वापरकर्ता इंटरफेस समजण्यास अतिशय साधा आणि सोपा आहे.

Lava Yuva 4 कॅमेरा : Lava Yuva 4 मध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामुळे तुम्ही खूप चांगले फोटो आणि सेल्फी घेऊ शकता. फोनची रचना खूप सुंदर आहे. त्याच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे, ज्यामुळx तुम्ही फोन सहज अनलॉक करू शकता.

हे वाचलंत का :

  1. Huawei चा स्वयं-विकसित ऑपरेटिंग सिस्टमसह पहिला Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच
  2. Redmi चा दमदार स्मार्टफोन Redmi K80 ची एंन्ट्री, अप्रतिम कॅमेऱ्यासह शक्तिशाली प्रोसेसर
  3. Redmi K80 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लॉंच, स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये

ABOUT THE AUTHOR

...view details