महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Jio च्या ग्राहकांसाठी खुशखबर! जिओचे स्वस्त कॉलिंग प्लॅन लॉंच, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर - JIO VOICE AND SMS PLANS

जिओनं फक्त व्हॉइस आणि एसएमएससह प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या श्रेणीतील 458 रुपये आणि 1958 रुपये किंमतीचे दोन प्लॅन देखील सादर केले आहेत.

Jio
जिओ (Etv Bharat MH DESK)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 23, 2025, 5:22 PM IST

हैदराबाद Jio Voice and SMS Only Plans :भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी, रिलायन्स जिओनं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार त्यांचे नवीन व्हॉइस ओन्ली आणि एसएमएस बेनिफिट प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. यात जिओनं 458 आणि 1958 रुपयांचे दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. जिओच्या या कॉलिंग आणि एसएमएस प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट मिळणार नाही. हे प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आणले आहेत, जे फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी मोबाईल वापरतात. या दोन्ही योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फायद्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...

जिओचा 458 रुपयांचा प्लॅन
जिओचा एंट्री-लेव्हल व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅन 458 रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1000 एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema (नॉन-प्रीमियम) आणि Jio Cloud सारख्या Jio ॲप्सचं सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

जिओचा 1985 रुपयांचा प्लॅन
जिओच्या वार्षिक व्हॉइस आणि एसएमएस-फक्त योजनेची किंमत आता 1985 रुपये आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता दिली जाते. आता जिओच्या या व्हॅल्यू प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 3600 एसएमएस मिळतील. याशिवाय, इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, या योजनेत JioTV, JioCinema (नॉन-प्रीमियम) आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचा प्रवेश समाविष्ट आहे.

जिओचे हे प्लॅन बंद
जिओनं आपल्या वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. जिओनं आपला पूर्वीचा मर्यादित डेटा, अमर्यादित कॉल आणि एसएमएस प्लॅन बंद केला आहे. यापूर्वी जिओकडं व्हॅल्यू प्लॅन श्रेणीतील तीन प्लॅन होते, ज्यांची किंमत 1899 रुपये, 489 रुपये आणि 189 रुपये होती. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, अमर्यादित कॉल, एसएमएस इत्यादी फायदे मिळत होते.

हे वाचलंत का :

  1. Samsung Galaxy S25 मालिकेचं नोएडा प्लांटमध्ये होणार उत्पादन
  2. नागपूरमध्ये स्वस्त भाडे आणि आधुनिक सुविधांसह ट्रॉली इलेक्ट्रिक बसेस सुरू होणार
  3. BMW X3 SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये...

ABOUT THE AUTHOR

...view details