हैदराबाद :भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओनं ट्रायच्या नवीन आदेशाचं पालन करून दोन नवीन व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्रीपेड प्लॅन आणले आहेत. हे प्लॅन अशा वापरकर्त्यांना अधिक सुविधा देतील ज्यांना प्रामुख्याने डेटा फायद्यांशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसची आवश्यकता आहे. जर तुम्ही परवडणाऱ्या व्हॉइस प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओच्या नवीनतम ऑफरची सविस्तर माहिती या बातमीत दिली आहे. जी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
जिओ व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्रीपेड प्लॅन
जिओ ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केलाय. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांसाठी असेल. तुम्ही एका रिचार्ज केल्यानंतर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल तसंच १,००० एसएमएस पाठवू शकता. तसंच यात जियोटीव्ही, जिओसिनेमा (नॉन-प्रीमियम) आणि जिओक्लाउडचा ॲक्सेसचा देखील समावेश आहे.
जिओचा १,७४८ रुपयांचा प्लॅन
जिओनं १,७४८ रुपयांचा प्लॅन देखील आणला आहे. या प्लॅनची वैधता ३३६ दिवस असेल. यात तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलसह ३,६०० एसएमएसचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्तजियोटीव्ही, जिओसिनेमा (नॉन-प्रीमियम) आणि जिओक्लाउडचा अॅक्सेस यात मिळेल. हे प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना मोबाइल डेटाची आवश्यकता नाहीय. त्यामुळं कंपनीनं बजेट-फ्रेंडली व्हॉइस-कॉलिंग सोल्यूशनची आवश्यकता आहे.
फक्त फक्त कॉलिंगसाठी प्लॅन वापरकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं की या प्लॅनमध्ये कोणताही डेटा प्लॅन समाविष्ट केलेला नाही. हे प्लॅन फक्त फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरकर्त्यांसाठी आहे. जियोनं या प्लॅनना "व्हॅल्यू प्लॅन" वरून "व्हॉइस-ओन्ली प्लॅन" असं रीब्रँड नाव केलं आहे. या प्लॅनमधील वापरकर्ते १३९ रुपये किंवा ६९ रुपयांच्या डेटा बूस्टरनं रिचार्ज करू शकत नाहीत.
प्रीपेड पॅक तुमच्यासाठी उत्तम पर्याय?
जर तुम्ही बजेट-कॉस्ट कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन शोधत असाल, तर नवीन जिओ प्रीपेड पॅक तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. तथापि, जर तुम्ही वारंवार मोबाइल डेटा वापरत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त डेटा पॅक खरेदी करावा लागू शकतो.