हैदराबाद :आयटीआर भरण्याची अंतिम तारीख : आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व करदात्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आयटीआर दाखल केला नाही, तर त्यांना दंडासह उशिरा आयटीआर भरावा लागणार आहे. त्याची अंतिम मुदत आधी 31 डिसेंबर 2024 होती, जी आयकर विभागानं 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवलीय.
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरू शकता?
- सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमचा पॅन कार्ड नंबर वापरून लॉगिन करा.
- तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म निवडा.
- मूल्यांकन वर्ष - आर्थिक वर्ष 24 साठी AY2024-25 निवडा.
- आवश्यक वैयक्तिक तपशील भरा.
- अर्ज दाखल करताना ₹ 5000 विलंब शुल्क लागू होईल.
- आधार ओटीपी वापरून सबमिट करा आणि पडताळणी करा.
तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही आयकर कार्यालयात जाऊन फॉर्म सबमिट करून पडताळणीचा पर्याय देखील निवडू शकता.
विलंब शुल्क
आयकर कायद्याच्या कलम 234एफ नुसार, उशिरा आयटीआर दाखल करण्यासाठी विलंब शुल्क दोन श्रेणींमध्ये निश्चित केलं आहे.
- वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास : 1000 रुपये विलंब शुल्क.
- वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास : 5000 रुपये विलंब शुल्क.
जर कर विवरणपत्रं दाखल केली नाहीत तर आयकर कायद्याच्या कलम 276 सीसी अंतर्गत शिक्षा होऊ शकते. आयटीआर वेळेवर दाखल करावा. यामुळे भविष्यातील समस्या तुम्हाला टाळता येतील. जर तुम्ही अजून आयटीआर दाखल केला नसेल, तर ही प्रक्रिया पूर्ण करा.
सुधारित परतावा पर्याय
15 जानेवारी (आयटीआर फाइलिंग डेडलाइन) पर्यंत उशिरा आयटीआर दाखल केल्यानंतरही, तुम्ही तुमची चूक दुरुस्त करण्यासाठी सुधारित रिटर्न दाखल करू शकता. सुधारित रिटर्नवर कोणतंही अतिरिक्त शुल्क किंवा दंड लागू नाही.
करदात्यांना महत्वाची सूचना
आयकर विभागाचे म्हणणे आहे की उशिरा आयटीआर (ITR Filing Deadline) दाखल केल्यानं तुमची कायदेशीर जबाबदारी तर पूर्ण होतेच, शिवाय भविष्यातील समस्या देखील टाळता येतात. जर तुम्ही अजून आयटीआर दाखल केला नसेल तर ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
भारतात मोफत ITR भरून घणाऱ्या वेबसाईट