हैदराबाद : रिलायन्स जिओनं स्मार्ट टीव्हीसाठी JioTele OS नावाची त्यांची नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर केलीय. याबाबत कंपनीनं म्हटलं की ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) भारतीय प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. Jio ची नवीन TV OS भारतात स्मार्ट टीव्ही अनुभव अधिक सुलभ बनवण्याच्या उद्देशानं सादर करण्यात आली आहे. JioTele OS, 21 फेब्रुवारीपासून थॉमसन, कोडॅक, BPL आणि JVC सारख्या ब्रँडच्या स्मार्ट टीव्हीवर डेब्यू करणार आहे.
JioTele OS
कंपनीनं घोषणा केली की JioTele OS टेलिव्हिजन 21 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. Thomson, Kodak, BPL आणि JVC सारख्या ब्रँडच्या स्मार्ट टीव्हीवर हे OS डेब्यू करणार आहे. Jio नं असंही म्हटलं, की या वर्षाच्या अखेरीस अधिक ब्रँड JioTele OS द्वारे समर्थित स्मार्ट टीव्ही ऑफर करतील.
Jio नं शेअर केलेल्या तपशीलांनुसार, नवीन सादर केलेल्या JioTele OS टीव्ही चॅनेल तसंच लोकप्रिय OTT ॲप्सना समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. JioTele OS वर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर क्लाउड-आधारित गेम समर्थिन असेल. वापरकर्ते एकाच रिमोटनं या सर्व वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवू शकतील - जिओ
JioTele OS तपशील
Jio नं सांगितलं की JioTele OS अधिक परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम सामग्री आणि स्मार्ट टीव्ही वैशिष्ट्ये ऑफर करणार आहे.
JioTele OS ची प्रमुख वैशिष्ट्ये
AI-चालित सामग्री शिफारस : कंपनीनं म्हटलं आहे की ऑपरेटिंग सिस्टम वैयक्तिकृत सामग्री शिफारसी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. नवीन OS 4K सामग्रीसाठी समर्थन देत असून टीव्हीवर चांगला विना अडथाळा कंटेट देतं. टीव्ही चॅनेलच्या लायब्ररी व्यतिरिक्त, JioTele OS अनेक OTT स्ट्रीमिंग ॲप्स, क्लाउड गेमिंग आणि बरेच काही प्रदान करतं, असं कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त, कंपनीनं म्हटले आहे की वापरकर्ते एकाच रिमोटचा वापर करून नवीन OS वरील सामग्रीमध्ये सहजपणे स्विच करू शकतील.
सॉफ्टवेअर समर्थन
JioTele OS नियमित सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे नवीन ॲप्स, सामग्री, विकसित तंत्रज्ञानाशी सुसंगत आहे. नवीन JioTele OS प्लॅटफॉर्म JioTV OS पेक्षा वेगळा आहे, ज्याची घोषणा गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. नवीन JioTele OS स्मार्ट टीव्हीसाठी आहे, तर JioTV OS प्लॅटफॉर्म Jio सेट-टॉप बॉक्ससाठी ऑपरेटिंग सिस्टम म्हणून काम करतं.
हे वाचलंत का :