हैदराबाद : 4 मार्च रोजी नथिंग फोन 3A सिरीजचं अनावरण होणार आहे. या लाइनअपमध्ये बेस आणि प्रो व्हेरिएंटचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी पुष्टी केली आहे की या सिरीजमधील हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल. विशेष म्हणजे, नथिंग फोन 2A सिरीजमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिप्सचा समावेश आहे. आता एक नवीन अहवाल ऑनलाइन समोर आला आहे. ज्यामध्ये नथिंग फोन 3Aआणि नथिंग फोन 3A प्रोच्या काही प्रमुख अपेक्षित स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. ज्यामध्ये प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेऱ्याची माहिती लिक झालीय. दोन्ही फोनमध्ये टेलिफोटो शूटर्ससह ट्रिपल रियर कॅमेरा युनिट मिळण्याची शक्यता आहे.
नथिंग फोन 3A सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये (अपेक्षित)
स्मार्टप्रिक्सच्या अहवालानुसार, नथिंग फोन 3A आणि फोन 3A प्रोमध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7एस जेन 3 एसओसी असण्याची अपेक्षा आहे. हँडसेटमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.72-इंच एमोलेड डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनला IP64 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 3a आणि Phone 3a Pro कॅमेरा
Nothing Phone 3a आणि Phone 3a Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचे प्राथमिक कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये 8मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्ससह फ्रंट कॅमेरा असू शकतो. बेस फोन 3a मध्ये 2x झूमसह टेलिफोटो शूटर मिळू शकतो. दरम्यान, Nothing Phone 3a Pro मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 3x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 60x पर्यंत हायब्रिड झूम सपोर्टसह 50-मेगापिक्सेल 1/1.95-इंच Sony LYT-600 टेलिफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
किती असेल किंमत?
ब्रँडच्या अलीकडील X पोस्टमध्ये आगामी Nothing Phone 3a सिरीज फोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूल लेआउटचा टीझरमध्ये एक पॅटर्न क्षैतिजरित्या तीन ठिपके दर्शवितो, तर दुसरा L-आकाराच्या सेटअपमध्ये दिसतो. याचा अर्थ असा होऊ शकतो की लाइनअपचे बेस आणि प्रो प्रकार एकसारखे नसतील. सुरुवातीच्या ऑफर्ससह, नथिंग फोन 3ए ची भारतात किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, तर फोन 3ए प्रो ची किंमत सुमारे 30,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. हा फोन 4 मार्च रोजी भारतासह जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. तो फ्लिपकार्टद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध असेल. उल्लेखनीय म्हणजे, यूके-आधारित OEM नं अलीकडेच पुष्टी केली की नथिंग फोन 3ए मालिकेतील हँडसेट चेन्नई येथील त्यांच्या उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जातील.
हे वाचलंत का :