हैदराबाद iQOO Neo 10 specifications leaked :iQOO चीनसह भारतात आपला फ्लॅगशिप iQOO 13 स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. या फोनचे फिचर देखील आता समोर आले आहेत. iQOO निओ 10 सीरींज नोव्हेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Neo 10 मॉडेल्समध्ये Snapdragon 8 Gen 3, 6,000mAh बॅटरी आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे.
iQOO 13 लाँच होण्यापूर्वीच iQOO Neo 10 सारींच चो नवीनतम फिचर समोल आले आहेत.
iQOO Neo 10 स्मार्टफोनसह iQOO 10 Pro लवकरच भारतात लॉंच होणार आहे. कंपनी निओ सीरीज वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी या लाइनअपमध्ये दोन नवीन फोन iQOO Neo 10 आणि Neo 10 Pro समाविष्ट करण्याची तयारी करत आहे. हे फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 आणि MediaTek Dimensity 9400 chipsets वर समर्थित असल्याची शक्यता आहे. दोन्ही मॉडेल्स 6000mAh पेक्षा मोठ्या बॅटरीसह देखील येऊ शकतात.
iQOO Neo 10 मालिका कधी लाँच होईल? :अलीकडंच चीनच्या प्लॅटफॉर्मवर आगामी डिव्हाइस iQOO निओ 10 मालिकेच्या लॉंच टाइमलाइचे संकेत दिले आहेत. वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, टिपस्टरनं सांगितलं की iQOO निओ 10 मालिका नोव्हेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीची निओ 9 मालिका डिसेंबरमध्ये लॉंच करण्यात आली होती.
iQOO निओ 10 वैशिष्ट्ये : टिपस्टरनं पूर्वी सांगितलं की iQOO निओ 10 मालिकेला चीनमध्ये 3C प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे. त्यामुळं डिव्हाइस काही प्रमुख वैशिष्ट्याबद्दल संकेत मिळताय. iQOO Neo 10 आणि Neo 10 Pro मध्ये अनुक्रमे V2425A आणि V2426A मॉडेल नंबर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 प्रोसेसर :दोन मध्यम-श्रेणी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3/ मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 प्रोसेसर आणि 120W जलद चार्जिंगसाठी समर्थन असलेली 6,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. iQOO Neo 9 मालिकेच्या प्लास्टिक फ्रेमच्या तुलनेत यात मेटल फ्रेम देखील असू शकते.
अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर :अलीकडील अहवालात असंही सुचवण्यात आलं की iQOO निओ 10 मालिका त्याच्या पूर्ववर्तीवरील ऑप्टिकल सेन्सरच्या तुलनेत अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ शकते. विशेष म्हणजे, अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर सामान्यतः ऑप्टिकलपेक्षा जलद, सुरक्षित मानलं जातं. आतापर्यंत सॅमसंग, गुगलच्या हाय एंड फोनवर पाहिलं गेलं होतं. त्यामुळं स्मार्टफोनला देखील अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल, जे बजेटमध्ये आणखी प्रीमियम वैशिष्ट्ये आणेल. इतर आगामी स्मार्टफोन जसे की iQOO 13, OnePlus 13 आणि Xiaomi 15 देखील अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात.
iQOO निओ 10 मध्ये काय असणार खास? : Neo 10 मालिकेत समोरील बाजूस 1.5K डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. AMOLED पॅनेलची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे, कारण Neo 9 फोनमध्ये आधीपासूनच AMOLED पॅनेल आहे. त्याचप्रमाणे, दोन्ही उपकरणांमध्ये मेटल मिडल फ्रेम असू शकतं, Android 15 सह OriginOS 5 वर हे फोन चालतील,तसंच 100W चार्जिंगला दोन्ही डिव्हाइस सपोर्ट करतील.Neo 10 मालिका आगामी OnePlus Ace 5, Realme GT Neo 7 आणि Redmi K80 लाइनअपशी स्पर्धा करेल. या तपशीलांव्यतिरिक्त, यावेळी फोनबद्दल जास्त माहिती नाही. नवीन माहिती उपलब्ध झाल्यास आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.
हे वाचलंत का :
- Oppo A3x 4G भारतात लॉंच, 5100mAh बॅटरीसह दमदार वेशिष्ट्ये, 10 हजारांपेक्षा कमी किंमत
- फोनवर देशभरात बंदी, सरकारच्या निर्णयामुळं खळबळ, का आली फोनवर बंदी?
- Nvidia नं Apple कंपनीला टाकलं मागं, 3.53 $ ट्रिलियनचं कंपनीनं बाजार मूल्य गाठलं