महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

ॲपलचा चीनला झटका : आयफोन 17 चं प्रथमच भारतात होणार उत्पादन - अहवाल - APPLE MANUFACTURED IN INDIA

ॲपल चीनबाहेर भारतात आपला आयफोन तयार करण्यावर भर देत आहे. पुढील वर्षी आयफोन 17 चं प्रथमच भारतात उत्पादन होणार आहे.

Apple
ॲपल (Etv Bharat MH DESK)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 30, 2024, 5:22 PM IST

हैदराबाद : Apple ने iPhone 17 च्या बेस मॉडेलवर काम सुरू केलं आहे. Apple कंपनी पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये iPhone 17 लाँच करू शकते. Apple नं गेल्या महिन्यात भारतासह जगभरात iPhone 16 सीरीज लाँच केली होती. ज्यामध्ये 4 फोन iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, आणि iPhone 16 Pro Max चा समावेश होता. त्यानंतर आता आयफोन 17 च्या निर्मितीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

आयफोन 17 प्रोटोटाइप : विशेषतः, भारतातील आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रिपोर्टनुसार, भारतात पहिल्यांदाच आयफोन 17 च्या प्रोटोटाइपला मोठ्या प्रमाणात उत्पादन मॉडेलमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम सुरू झालंय. भारतीय आयफोन निर्मिती युनिटनं एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ असेल. हे भारतातील फोन उत्पादन युनिटचं उत्कृष्ट यश असेल. द इन्फॉर्मेशननं दिलेल्या अहवालात, ही माहिती समोर आली आहे.

नवीन आयफोनचं उत्पादन भारतात : सप्टेंबर 2025 मध्ये रिलीझ होणाऱ्या iPhone 17 मध्ये डिस्प्ले आणि प्रोसेसिंग पॉवरमध्ये काही लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. ॲपल चीनच्या बाहेर नवीन आयफोन बनवण्याची आणि विकसित करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी ॲपलनं चीनशिवाय इतर कोणत्याही देशात आयफोन डेव्हलपमेंटचं काम केलं नव्हतं, मात्र यावेळी कंपनीनं भारताची निवड केली आहे.

नवीन मॉडेल्स विकसित :ऍपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी मॅकरुमर्स वेबसाइटच्या अहवालाचा हवाला देत सांगितलं होतं की, आयफोन 17 चे 'उत्पादन' भारतात 2025 च्या उत्तरार्धात सुरू होईल. भारतात आयफोनची लोकप्रियता झपाट्यानं वाढलीय. कूओनं असाही अंदाज व्यक्त केला की, ऍपल भारतात उत्पादन वाढवत असल्यानं झेंगझो आणि तैयुआन, चीनमध्ये फॉक्सकॉनची उत्पादन पातळी 2024 पर्यंत 75-85% ने कमी केली जाऊ शकते. ऍपल पहिल्यांदाच भारतात नवीन मॉडेल्स विकसित आणि उत्पादन करत आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये ऍपलची भारतात लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. ऍपलच्या उत्पादनांनी, विशेषत: iPhones नं भारतात मोठं यश मिळवलं आहे. दुसरीकडं, चीनमध्ये नेमकं उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. ॲपलची लोकप्रियता आणि यश दोन्ही चीनमध्ये घटलं आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ :सूत्रांनुसार, Apple नं भारतात उत्पादित केलेल्या सुमारे $6 अब्ज किमतीचे iPhones निर्यात केले. जे मागील वर्षाच्या तुलनेत एक तृतीयांश वाढ दर्शवते. भारताच्या स्मार्टफोन निर्यातीमध्ये iPhones चा मोठा हिस्सा आहे. Apple नं Foxconn, Pegatron आणि Tata-मालकीच्या Wistron सोबत भारतात iPhones निर्मितीसाठी भागीदारी केली आहे. आता याबाबतची पुढची मोठी बातमी कधी आणि कोणती येते हे पाहणे बाकी आहे.

हे वाचलंत का :

OnePlus 13 उद्या होणार लॉंच, 6000 mAh बॅटरीसह मिळणार वायरलेस चार्जिंग

Apple Mac Mini दोन चिपसेट व्हेरियंटमध्ये भारतात लॉंच

Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Xiaomi 15 Pro लॉंच, स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह 6100mAh बॅटरी

ABOUT THE AUTHOR

...view details