नवी दिल्ली Day Against Nuclear Tests : दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय अणु चाचणी विरुद्ध दिवस साजरा केला जातो. 2 डिसेंबर 2009 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 64 व्या अधिवेशनात या दिवसाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. 16 जुलै 1945 पासून आत्तापर्यंत सुमारे 2000 अण्वस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे.
अणु चाचणी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवसाचा इतिहास :16 जुलै 1945 रोजी अण्वस्त्र चाचण्या सुरू झाल्या होत्या. तेव्हापासून आत्तापर्यंत 2 हजारांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अणुचाचणीच्या सुरुवातीला त्याचा मानवी जीवनावरील विनाशकारी परिणामांचा फारसा विचार केला गेला नाही. त्यामुळं अण्वस्त्र चाचण्याचे भयंकर आणि दुःखद परिणाम मानवाला भोगावे लागले आहेत. 16 जुलै 1945 रोजी अण्वस्त्र चाचणीत भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहाइमर यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं, की भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे पहिले राजकारणी होते, ज्यांनी 2 एप्रिल 1954 रोजी अणुचाचणीवर “स्टँड स्टिल” कराराची मागणी केली होती.
आण्विक चाचण्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस :2 डिसेंबर 2009 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 64 व्या अधिवेशनात एकमतानं ठराव मंजूर करण्यात आला होता. ज्यात 29 ऑगस्ट हा दिवस आण्विक चाचण्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला. ठरावामध्ये "अण्वस्त्र चाचणी स्फोट किंवा इतर कोणत्याही अण्वस्त्र स्फोटाच्या परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्याची हा दिवस साजरा केला जातो. अण्वस्त्रमुक्त जगाचे ध्येय साध्य करण्याचं एक साधन म्हणून या ठरावाला फार महत्व आहे.
द बिगिनिंग ऑफ द न्यूक्लियर एरा : युनायटेड स्टेट्सनं 16 जुलै 1945 रोजी न्यू मेक्सिकोमध्ये "ट्रिनिटी" नावाच्या 20 किलोटन अणुबॉम्बचा स्फोट करून अणुयुगाची सुरुवात केली होती. तसंच 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमावर "लिटल बॉय" आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर "फॅट मॅन" अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. या हल्ल्यात सुमारे 2 लाख 20 हजार जपानी नागरिक ठार झाले होते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियनमध्ये अण्वस्त्रांची शर्यत सुरू झाली होती. युनायटेड स्टेट्सनं 1946 ते 1949 दरम्यान आणखी सहा बॉम्बची चाचणी केली. सोव्हिएत युनियननं 29 ऑगस्ट 1949 रोजी "कोल्ड वॉर" अण्वस्त्रांची शर्यत सुरू करून "जो 1" या पहिल्या बॉम्बची चाचणी केली. 1954 मध्ये, भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुचाचणी थांबवण्याची विनंती केली होती.
CTBT नंतर अणु चाचण्या :1998 ते 2017 पर्यंत