महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

दोन AMOLED डिस्प्लेसह Infinix Zero Flip लॉंच, जाणून घ्या किंमत

Infinix Zero Flip smartphone launched : Infinix नं भारतात Infinix Zero Flip स्मार्टफोन लॉंच केला आहे. ज्यात 6.9 इंच LTPO AMOLED इनर स्क्रीन डिस्प्ले आहे.

Infinix Zero Flip लॉंच
Infinix Zero Flip लॉंच (Infinix)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 17, 2024, 8:30 PM IST

हैदराबाद Infinix Zero Flip smartphone launched :Infinix India नं गुरुवारी आपला नवीन Infinix Zero Flip स्मार्टफोन भारतात लॉंच केला. हा स्मार्टफोन कंपनीचा पहिला क्लॅमशेल-स्टाईल फोल्डेबल फोन म्हणून लॉंच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.9 इंच LTPO AMOLED इनर स्क्रीन आणि 3.64 इंच AMOLED कव्हर डिस्प्ले आहे.

Infinix Zero Flip स्मार्टफोन (Infinix)

तीन वर्ष सुरक्षा अपडेट : फोनमध्ये MediaTek डायमेंशन 8020 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आहे. Infinix Zero Flip मध्ये दोन 50-मेगापिक्सेल बाह्य कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. हा फोन Android 14 वर चालतोय. या फोनला दोन Android OS आवृत्ती अपग्रेड आणि तीन वर्षांची सुरक्षा अपडेट मिळतील, असा कंपनीचा दावा आहे.

Infinix Zero Flip स्मार्टफोन (Infinix)

Infinix Zero Flip फिचर : Infinix Zero Flip ला ड्युअल सिम (नॅनो + नॅनो) सपोर्ट मिळतोय. Infinix Zero Flip Android 14 वर चालतो. यासाठी कंपनीनं XOS 14.5 प्रणाली दिली आहे. हँडसेट UTG 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.9-इंच फुल-HD+ LTPO AMOLED अंतर्गत स्क्रीनचा वापर करतो.

Infinix Zero Flip स्मार्टफोन (Infinix)

3.64-इंचाचा AMOLED कव्हर डिस्प्ले :120Hz च्या रिफ्रेश रेटसह 3.64-इंचाचा AMOLED कव्हर डिस्प्ले, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण यामध्ये मिळतं. Infinix नं MediaTek Dimension 8200 प्रोसेसरसह Zero Flip लॉंच केलंय. जे 8GB LPDDR4X RAM सह जोडलेलं आहे. यात 512GB UFS 3.1 स्टोरेज आहे. मात्र ते एक्सपांडेबल स्टोरेज कार्ड वापरून वाढवता येत नाही.

Infinix Zero Flip स्मार्टफोन (Infinix)

ड्युअल कॅमेरा सेटअप :बाह्य स्क्रीनवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 114-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. हे 4K/30fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतं. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो 4K/60fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

Infinix Zero Flip ची किंमत : Infinix Zero Flip चा 8GB + 512GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 54 हजार 999 रुपये किमतीत लॉंच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लॉसम ग्लो आणि रॉक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये 49 हजार 999 रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध आहे. 24 ऑक्टोबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर फोन विक्रीसाठी भारतात उपलब्ध होईल. ई-कॉमर्स वेबसाइटवरून Infinix Zero Flip खरेदी करताना ग्राहकांना SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 5 हजारांची सूट मिळू शकते.

हे वाचलंत का :

  1. क्रूझर टायझरची विशेष आवृत्ती लाँच, क्रूझर टायझरमध्ये काय आहे खास?
  2. UGC NET परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर, कुठं पाहणार UGC NET परीक्षेचा निकाल?
  3. Redmi A4 5G : स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर असलेला भारतातील पहिला फोन, 10 हजारांपेक्षा कमी किंमत

ABOUT THE AUTHOR

...view details