हैदराबाद : बजाज ऑटोच्या सर्वात लोकप्रिय बाईक पल्सरचा एक नवीन प्रकार ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे, ही बाईक कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. कंपनीनं बजाज पल्सर एनएस १२५ अपग्रेड केलं आहे. आता ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी या बाईकमध्ये सिंगल चॅनेल एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम) फीचर जोडण्यात आलं आहे. या फीचरच्या समावेशानंतर, ही बाईक आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. या बाईकचे अपग्रेडेड मॉडेल गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं होतं, 2024 च्या व्हेरिएंटमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि हॅलोजन टर्न इंडिकेटरसह नवीन हेडलॅम्प समाविष्ट होते. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह लाँच केलेल्या या बाईकची किंमत जाणून घेऊया...
बजाज पल्सर एनएस 125 एबीएस किंमत
बजाज ऑटोच्या या नवीन पल्सरची किंमत 1 लाख 06 हजार 739 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. या बाईकमध्ये एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिसेल, जो पहिल्यांदा पल्सर N160 आणि पल्सर N150 मध्ये देण्यात आला होता. या डिजिटल क्लस्टरवर, तुम्हाला रिअल टाइम इंधन वापर, स्पीडोमीटर, मायलेज आणि गियर पोझिशन इंडिकेटर सारखी माहिती मिळेल. एवढंच नाही तर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बजाज राइड कनेक्ट ॲप्लिकेशनद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतं. याशिवाय, मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी एक यूएसबी पोर्ट देखील देण्यात आला आहे.
इंजिन तपशील12bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड ट्रान्समिशनसह येणाऱ्या या बाईकमध्ये पुढील बाजूस २४० मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी डिस्क ब्रेक आहे. ही बाईक एका लिटर तेलात 64.75 किमी पर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीनं केलाय.
बजाज पल्सर NS125 ABS प्रतिस्पर्धी
बजाजची ही लोकप्रिय बाईक थेट हिरो एक्सट्रीम 125आर आणि टीव्हीएस रेडरशी स्पर्धा करेल. हिरो मोटोकॉर्पच्या या बाईकची किंमत 1.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर या टीव्हीएस बाईकची किंमत 1.04 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
हे वाचलंत का :