हैदराबाद :Google Pixel phones banned: काही दिवसांपूर्वी iPhone 16 च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर इंडोनेशियानं Google Pixel फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. इंडोनेशियानं देशांतर्गत तंत्रज्ञान वस्तूची खरेदी न केल्यामुळं Google Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
iPhone 16 च्या विक्रीवर बंदी :इंडोनेशिया सरकारच्या नियमांनुसार, तंत्रज्ञान कंपन्यांनी हँडसेट आणि टॅब्लेटचे 40% घटक देशांतर्गत घेतले पाहिजेत. या गरजा स्थानिक उत्पादन, फर्मवेअर विकास किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये थेट गुंतवणूकीद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात, असं इंडोनेशिया सरकारचं म्हणणे आहे. इंडोनेशियाने का घातली बंदी, जाणून घ्या सविस्तर...
Google स्मार्टफोन विकता येणार नाही :इंडोनेशियाच्या उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 40% स्थानिक वस्तूची आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय Google स्मार्टफोन विकले जाऊ शकत नाहीत. उद्योग मंत्रालयाचे प्रवक्ते फेब्री हेन्ड्री अँटनी ॲरिफ म्हणाले की, Google नं विक्री पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्थानिक वस्तूचं प्रमाणपत्र प्राप्त करणं आवश्यक आहे.