चेन्नई Conference on Quantum Communication : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासनं (IIT मद्रास) 26 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत क्वांटम कम्युनिकेशन, मापन आणि संगणन (QCMC 2024) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. परिषदेची ही 16 वी आवृत्ती असून ही भारतात होणारी पहिलीच परिषद आहे.
सर्वात प्रतिष्ठित जागतिक परिषद :सेंटर फॉर क्वांटम इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटिंग (CQuICC), IIT मद्रास येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, यांनी या परिषदेचं संयोजन केलं आहे. 1990 मध्ये स्थापित, QCMC हे क्वांटम परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी सर्वात प्रतिष्ठित जागतिक परिषद आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सिंगमधील संशोधनाची माहिती देण्यासाठी जगभरातील तज्ञांन या परिषदेत एकत्र येणार आहेत. परिषद IIT मद्रास, Mphasis F1 Foundation आणि KLA द्वारे प्रायोजित आहे.
50 स्टार्ट-अप क्वांटम तंत्रज्ञानानात काम :आज (26 ऑगस्ट 2024) उद्घाटन सत्रादरम्यान 'भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन' वर भाषण देताना, नॅशनल क्वांटम मिशनच्या मिशन गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. अजय चौधरी म्हणाले, “आयआयटी मद्रासला परिषद आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. भारतात आधीच याबाबत अधिक काम चालू आहे. विशेषत: आयआयटी मद्रासमध्ये यावर संशोधन सुरू आहे. नॅशनल क्वांटम मिशन असलेल्या डीएसटीनं केलेल्या योजनेनुसार, आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि इतर मंत्रालयांसह अनेक प्रकल्पांवर काम करण्यास सुरुवात केलीय. भारतात सुमारे 600 शास्त्रज्ञ आणि 40 ते 50 स्टार्ट-अप क्वांटम तंत्रज्ञानामध्ये काम करत आहेत.
राष्ट्रीय क्वांटम मिशनची घोषणा :“आम्ही क्वांटम तंत्रज्ञानाच्या सर्व भागांची काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी काम करत आहोत. नॅशनल क्वांटम मिशन लाँच केल्यानंतर, आम्हाला थीमॅटिक पार्क्स आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रांची स्थापना करण्यासाठी सुमारे 385 प्रस्ताव प्राप्त झाले. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लवकरच, राष्ट्रीय क्वांटम मिशनची घोषणा करणार आहे. चार स्वतंत्र विभाग 08 कंपन्या स्थापन करण्याची योजना आहे. संगणन, संप्रेषण, साहित्य असं सर्व संशोधकांना आम्ही हब अंतर्गत एकत्र आणू. शिवाय, स्टार्ट-अप्सचा मोठ्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. आम्ही सुमारे 40 स्टार्ट-अपना पत्र लिहिलंय.