हैदराबाद : भारत सरकारनं शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी एक सर्वात म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना आहे. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांच्या कृषी गरजा पूर्ण करणे, उत्पादकता वाढवण्यास मदत करण्याचा समावेश आहे. त्यामुळं तुमच्याकडं किसान क्रेडिट कार्ड नसेल, तर तुम्ही देखील त्यासाठी अर्ज करू शकता. डिजिटायझेशनमुळं किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करणे सोपं आणि अधिक सुलभ झालं आहे. KCC साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?, अर्जाची प्रकिया काय आहे?, किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?, चला जाणून घेऊया...
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? :किसान क्रेडिट कार्ड ही एक सरकारी क्रेडिट सुविधा योजना आहे. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकं आणि इतर कृषी खरेदीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं. ही योजना 1998 मध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) द्वारे सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून ती शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करत आहे.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे :
- लवचिक क्रेडिट मर्यादा :क्रेडिट मर्यादा स्थानिक बँकेनं ठरवलेल्या वित्त स्केलवर आणि शेतकऱ्याच्या गरजांवर आधारित आहे.
- कमी व्याजदर : KCC कर्जे सामान्यत: पारंपारिक कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदरासह शेतकऱ्यांना दिलं जातं, ज्यामुळं ते अधिक परवडणारं असतं.
- विमा संरक्षण :या योजनेत अनेकदा विम्याचा समावेश होतो. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा मिळते.
- सुलभ परतफेड :शेतकरी हंगामानंतर कर्जाची सुलभ परतफेड करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :किसान क्रेडिट कार्डसाठी अधिकृत बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि इतर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये KCC साठी ऑनलाइन अर्ज करता योतो.
KCC कार्ड : बँकेच्या मुख्यपृष्ठावर, "कृषी कर्ज" किंवा "किसान क्रेडिट कार्ड" विभाग शोधा. हा विभाग तुम्हाला सहसा कर्ज टॅब अंतर्गत दिसून येईल.
अर्ज भरा : ऑनलाइन फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज लिंकवर क्लिक करा. वैयक्तिक माहिती, जमीनधारक तपशील आणि आर्थिक आवश्यकतांसह आवश्यक तपशील भरा. विलंब टाळण्यासाठी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा.
आवश्यक कागदपत्रं अपलोड करा :यासाठी तुम्हाला अनेक दस्तऐवज अपलोड करावे लागतील.
- ओळखीचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र इ.)
- पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, युटिलिटी बिल इ.)
- जमिनीच्या मालकीची कागदपत्रे (जमीन लीज, मालकी प्रमाणपत्र इ.)
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- बँक स्टेटमेंट्स (लागू असल्यास)
पुन्हा तपासून सबमिट करा. एकदा तुम्ही सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जातील माहिती पडताळून पहा. सर्व माहिती बरोबर असल्याची पुष्टी केल्यानंतर पुढं जा.
अर्जाची पोचपावती प्राप्त करा : सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला संदर्भ क्रमांकासह पोचपावती मिळेल. हे तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
बँक पडताळणी :बँक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल. पुढील पडताळणीसाठी बँक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधू शकतो.
मंजूरी आणि क्रेडिट मर्यादा असाइनमेंट : एकदा मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला तुमची क्रेडिट मर्यादा आणि कर्जाच्या अटींबद्दल सूचित केलं जाईल. लिंक केलेल्या बँक खात्याद्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे निधीमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.
असा करा ऑफलाईन अर्ज :
किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी ऑफलाइन अर्ज :
पायरी 1. KCC ऑफर करणाऱ्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या (उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक इ.) KCC अर्जासाठी विचारा, फोटोकॉपी घ्या किंवा फॉर्मची प्रिंटेड प्रत घ्या
पायरी 2 : अर्ज भरा
- आवश्यक तपशीलांसह फॉर्म काळजीपूर्वक भरा:
- वैयक्तिक तपशील (नाव, पत्ता, फोन नंबर इ.)
- जमीनधारणा तपशील (जमिनीची मालकी, आकार, इ.)
- पीक तपशील (प्रकार, क्षेत्र इ.)
- कर्ज आवश्यकता